Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शैक्षणिक दिनदर्शिका PDF | Educational Calendar PDF | वर्षभरातील शैक्षणिक कामाचे माहेवार नियोजन PDF | दैनंदिन व दरमहा करावयाची कामे

Educational Calendar PDF | शैक्षणिक दिनदर्शिका PDF|वर्षभरातील शैक्षणिक कामाचे माहेवार नियोजन | दैनंदिन करावयाची कामे| दरमहा करावयाची कामे






दैनंदिन करावयाची कामे

१. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक साधनतंत्रे, अध्यापनपद्धती यांचे नियोजन करून वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजनाप्रमाणे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करणे, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे.

२. शाळेचा परिसर, स्वच्छतागृह, वर्गखोल्या, पिंक रूम, ग्रंथालय, प्रयोगशाळा इत्यादींची स्वच्छता करून परिपाठ घेणे. (हात धुणे, शरीर स्वच्छता, मूल्यसंस्कार आणि वडीलधाऱ्यांना नमन)

३.'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेअंतर्गत आहार वाटप करणे व लाभार्थी संख्येची PM Poshan पोर्टलवर नोंद करणे.

४. VSK पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे.



दरमहा करावयाची कामे

१. अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे. आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन करणे.

२. शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना प्रशिक्षण देणे. (५० तास CPD)

३. विविध स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.

४. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे. विविध शैक्षणिक साहित्यनिर्मिती करणे.

५. 'आनंददायी शनिवार' उपक्रम राबवणे.

६. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.

७. शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना दाखला देणे तसेच विद्‌यार्थ्यांना व पालकांना गरजेनुसार बोनाफाईड सर्टिफिकेट देणे.

८. FLN अंतर्गत मातागटाच्या WhatsApp ग्रुपवर पालकांना व्हिडिओ पाठवणे.

९. महिनाअखेरीस मासिक पत्रके, उपस्थिती भत्ता इत्यादी माहिती देणे.

१०. 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेअंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाची मागणी करणे, तो माल शाळेत पावतीप्रमाणे उतरवून घेणे, व्यवस्थित ठेवणे, त्याची देखभाल करणे, नियमित हिशोब ठेवणे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीप्रमाणे दररोज पोषण आहार शिजवून देणे, यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

११. प्रत्येक महिन्यातील 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेअंतर्गत इंधन, भाजीपाला व पूरक आहार देयक यांची ऑनलाइन तपासणी करणे व प्राप्त अनुदानातून देयक अदा करणे.

१२. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांतर्गत रोजकीर्द, खतावणी, दरपत्रक निविदा फाईल, व्हाउचर (पावती) फाईल, साठा नोंदवही व इतिवृत्त इत्यादी रेकॉर्ड तयार करणे.

१३. शाळेतील सर्व प्रकारच्या अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे.

१४. शालार्थ प्रणालीद्वारे शिक्षक वेतन देयक तयार करून DDO2 कडे पाठवणे.

१५. विविध संस्था/NGO यांच्याशी झालेल्या करारानुसार राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१६. UDISE + पोर्टल-विद्यार्थी IMPORT, Left with TC करणे, आधार, अपार, भौतिक सुविधा इ. माहिती अपडेट करणे.

१७. केंद्रशासन व राज्यशासन स्तरांवरून वेळोवेळी सूचित केलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१८. जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, किशोर या मासिकांमधील आवश्यक उपक्रम शाळेत राबवणे.

१९. शालेय स्तरावरील विविध समित्यांच्या बैठकांचे आयोजन करणे.

२०. शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेणे.


शैक्षणिक दिनदर्शिका 2026-27

शैक्षणिक कामकाज माहेवार नियोजन PDF - Click Here 

माहे - जून PDF

माहे - जुलै PDF

माहे - ऑगस्ट PDF

माहे - सप्टेंबर PDF

माहे - ऑक्टोबर PDF

माहे - नोव्हेंबर PDF

माहे - डिसेंबर PDF

माहे - जानेवारी PDF

माहे - फेब्रुवारी PDF

माहे - मार्च PDF

माहे - एप्रिल PDF

माहे - मे PDF


माहे - जून 


माहे - जुलै


माहे - ऑगस्ट


माहे - सप्टेंबर 


माहे -  ऑक्टोबर 


माहे - नोव्हेंबर 


माहे - डिसेंबर 


माहे - जानेवारी 


माहे - फेब्रुवारी 


माहे - मार्च


माहे - एप्रिल / मे



सौजन्य 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 

Desigring, Typesetting and Printing by Runa Graphics, Pune


Post a Comment

0 Comments

close