मासिक पाळीच्या आधी आठ-दहा दिवस लहानसहान कारणांवरून चिडचिड होते? दैनंदिन काम करण्यात उत्साह जाणवत नाही? एखादी छोटी गोष्ट मनाविरुद्ध झाली, तर जीव देण्याइतके टोकाचे निर्णय घेण्याची इच्छा होते? आणि हे सगळं महिन्यातील ठराविक दहा दिवसच होतं का? असं असेल, तर मासिक पाळी येण्याच्या आधी होणाऱ्या आजाराची ही लक्षणं आहेत. काय आहे हा आजार? त्याची लक्षणं काय?
कशी होते आजराची सुरुवात?
मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी प्रत्येक महिला 'प्री-मेन्सट्रूअल सिंड्रोम'ला सामोरी जात असते. अशावेळेस लहान मोठ्या गोष्टींवरून चिडचिड होणं, दैनंदिन कामं करताना उदास वाटणं, छोट्या-छोट्या कारणांवरून रडायला येणं, सातत्यानं मूड बदलत राहणं अशा मानसिक आणि शारीरिक बदलांना प्रत्येक स्त्री सामोरी जात असते. 'प्री-मेन्सट्रूअल डिस्फोरिक डिसऑर्डर' हा आजार म्हणजे 'प्री-मेन्सट्रूअल सिंड्रोम'चं तीव्र स्वरूप आहे. मासिक पाळीच्या आधी शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण कमी जास्त होत असतं. मनाला संतुलित ठेवणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे मनाचं संतुलन या दिवसात बिघडतं. मासिक पाळी सुरु होण्याच्या आधी आठवडाभर या आजाराची सुरुवात होते. मात्र, हा आजार सगळ्या स्त्रियांना जाणवतोच असं नाही. अनेकदा अनुवंशिकता, मानसिक ताणतणाव, दैनंदिन आयुष्यात अति मेहनत, नियमित संतुलित आहाराचं सेवन होत नसल्यास हा आजार होण्याची शक्यता अधिक वाढते.
लक्षणं
- कोणतंही काम न करण्याची इच्छा होणं.
- लहान-मोठ्या कारणांवरून जीव देण्याची इच्छा होणं.
- घर आणि ऑफिसच्या कामामध्ये लक्ष न लागणं.
- छोट्या कारणांवरून घरातील वस्तू फेकून देण्याची इच्छा होणं.
- दैनंदिन आयुष्यात उदासीनता.
- तासनतास एकटे बसून राहण्याची इच्छा होणं.
- छोट्या- छोट्या कारणांनी रडायला येणं.
कशी घ्याल काळजी?
मासिक पाळीच्या आधी शरीरातील असंतुलित झालेल्या हार्मोन्समुळे महिलांना हा आजार होतो. अशावेळेस त्यांच्या कोणत्याही वागण्यावर त्यांना संयम ठेवता येणं शक्य नसतं. महिलांची शारीरिक आणि मानसिक अवस्था समजून घेऊन घरातील लोकांनी त्यांच्या कलेने घेणं महत्त्वाचं आहे. अशावेळेस त्यांच्याशी वाद न घालता, त्यांच्या चुका न दाखवता त्यांना त्यांच्या शरीरातील बदलांविषयी समजून सांगणं गरजेचं असतं. महिन्याच्या अंतरानं त्यांच्या शरीरात होणारे बदल समजून घेऊन डॉक्टरांचं मार्गदर्शन, योग्य उपचार आणि त्यांच्या आहाराकडे लक्ष्य देणं महत्त्वाचं आहे.
००००
अनेकदा या आजाराच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कॉलेजांमध्ये या आजाराची उपचार पद्धती आणि लक्षणं याविषयीची माहिती द्यायला हवी. या आजराविषयी महिलांनी मोकळेपणानं बोलायला हवं, जेणेकरून समाजामध्ये या विषयीची जागरूकता निर्माण होईल आणि लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील.
- सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments