Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालेय शिक्षणाच्या सबलीकरणासाठी स्टार प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी स्टार्स प्रकल्पाला मंजुरी दिली. 

नव्या शिक्षण धोरणांतर्गत (NEP 2020) विविध राज्यांतील शालेय शिक्षण व्यवस्थेला बळकट करण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचं संपूर्ण नाव आहे - *स्ट्रेंथनिंग टिचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स (STARS) प्रकल्प.*


बुधवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळाले असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे ५,७१८ कोटी रुपयांचा आहे.

राज्यातील शालेय शिक्षणाचा स्तर उंचावून विकास करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की हा प्रकल्प केंद्र सरकारद्वारे प्रायोजित आहे. शिक्षण मंत्रालयाद्वारे त्याची अंमलबजावणी होणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांना सहाय्य केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments

close