Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कला उत्सव 2020 माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला - उत्सव

*प्रति,* 
1.प्राचार्य, प्रादेशिक विद्या     
    प्राधिकरण, मुंबई,
 2.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व 
     प्रशिक्षण संस्था,सर्व
 3.शिक्षणाधिकारी (माध्य.)


माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. 

सन 2020 -21 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये *शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत, पारंपारिक लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक* *लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र-शिल्प व खेळणी* *तयार करणे* या 9 कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. यासाठी 10 डिसेंबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर नामनिर्देशन करावयाचे आहे. कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक(solo) सहभाग असणार आहे. कला -उत्सव स्पर्धेबाबत मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत . सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्याने आपल्या कलेचा 4  ते 6 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून हा व्हिडीओ व कला सादर करत असतानाचे 5 फोटो  स्वतःच्या/ पालक/ शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर किंवा यु-ट्युब अकाउंट वरून       #kalautsavmah2020       हा हॅशटॅग वापरून दि. 27 नोव्हेंबर 2020 संध्या. 5.00 वाजेपर्यंत पोस्ट करावा. व्हिडिओ पोस्ट करताना विद्यार्थ्याने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा यु -डायस क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आयडी संपर्क क्रमांक व सहभाग घेत असलेला कलाप्रकार इत्यादींचा उल्लेख करावा. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांने https://covid19.scertmaha.ac.in/kalautsav/ या वेबपोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतरच स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित होईल. नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्याने अचूक भरावी. व्हिडीओ पोस्ट करतानाची प्राप्त झालेली link नोंदणी करताना सूचित केलेल्या ठिकाणी paste करावी. दि. 27 नोव्हेंबर 2020 संध्या.५ वाजे नंतर झालेली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही. व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जिल्हास्तरावर परीक्षण समितीमार्फत व्हिडिओची तपासणी करून प्रत्येक जिल्ह्यातून 9 कला प्रकारांमध्ये 1 विद्यार्थी व 1 विद्यार्थिनी अशा 18 सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची नावे निश्चित करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ही नावे पाठवण्यात येतील. राज्यस्तरावरील प्राप्त नामनिर्देशनामधून प्रत्येक कला प्रकारासाठी 1  विद्यार्थी व 1 विद्यार्थिनी अशी 18 नावे अंतिम करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ही नावे कळविण्यात येतील. राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा या ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येतील. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विजेता ठरल्यास विद्यार्थ्यांस रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाईल.या स्पर्धेबाबतची माहिती सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी.
 -
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

Tags
शैक्षणिक बातम्या,कला उत्सव,शैक्षणिक उपक्रम,मूल्यांकन प्रपत्र,

Post a Comment

0 Comments

close