Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोणते ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल?

पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र म्हणजेच EPIC जवळ असणे आवश्यक आहे. 


जर EPIC नसेल तर खालील 9 ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रात सादर करणे आवश्यक आहे. 

१) आधारकार्ड
२) वाहन चालक परवाना 
३) पॅन कार्ड
४) भारतीय पासपोर्ट
५) राज्य/केंद्र शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य खाजगी उद्योग समूहांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र
६) लोकसभा व राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांना निर्गमित केलेली अधिकृत ओळखपत्रे
७) पदवीधर व शिक्षक मतदार संघामधील शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना संबंधित संस्थांनी निर्गमित केलेले ओळखपत्र
८) विद्यापीठाने निर्गमित केलेले पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र
९) सक्षम प्राधिकरणाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले ओळखपत्र


महत्त्वाची सूचना

१) केवळ EPIC आहे किंवा पदवीधर आहे किंवा शिक्षक आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही. त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी येथे टच/क्लिक करा.


२) मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती किंवा ऑनलाईन यादीत नाव असलेल्या ची प्रिंट ग्राह्य धरली जाणार नाही. तर मतदार छायाचित्र EPIC किंवा वरील ९ ओळखपत्रा पैकी कोणतेही १ ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील.

    अधिक माहितीसाठी helpline no. 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता


वाचा - अतिशय उपयुक्त 





Post a Comment

0 Comments

close