Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती बाह्य एजन्सी सोबत सामायिक (share) न करणेबाबत....

सद्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रावर देखील याचा परिणाम झाला आहे. मार्च 2020 पासून देशातील शाळा, महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी शिक्षण विभागांमार्फत प्रयत्न सुरु आहेत. 
     याचाच एक भाग म्हणून विविध ऑनलाईन पर्यायांचा वापर शासन स्तरावरुन तसेच शालेय स्तरावरुन होत आहे. ही एक चांगली बाब असली तरी काही शाळा आपले स्तरावरुन महागड्या अशा शैक्षणिक अॅप चार वापर ऑनलाईन शिक्षणासाठी करिता आहेत. त्यासाठी पालकांकडून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती मागवून घेण्यात येते. रजिस्ट्रेशन, LOC करिता पालकांकडून प्राप्त विद्यार्थ्यांची माहिती संबंधित शाळेकडून बाह्य एजन्सी उदा. खाजगी संस्था, कोचिंग संस्था, महाविद्यालये इतरांना पुरवित असल्याच्या तक्रारी शासनास व केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSC यांना देखील प्राप्त झाल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करण्याविषयी शासन स्तरावरुन कळविण्यात आले आहे. 
     राष्ट्रीय स्तरावरुन दिक्षा अॅपचा वापर करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. सदर प्लॅटफॉर्म पुर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांना आवश्यक असे सर्व शैक्षणिक साहित्य येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. NCERT / SCERT यांनी मान्यता देण्यात आलेली शैक्षणिक अॅप किंवा शैक्षणिक साहित्यच वापरण्यात यावे. मान्यतेशिवाय वैयक्तिक हितासाठी असे कोणतेही साहित्य वापरण्यात किंवा प्रसारित करण्यात येवू नये. याबाबत सर्व शाळांना योग्य त्या सूचना देण्याबाबत SCERT संचालक यांनी आदेशित केले आहे.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👇

Post a Comment

0 Comments

close