Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'ग्लोबल' रणजितसिंह डिसले गुरुजी व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या उषा खरे कौन बनेगा करोडपती च्या सेटवर

कौन बनेगा करोडपती च्या कर्मवीर एपिसोडमध्ये रणजितसिंह डिसले आणि उषा खरे दिसणार आहेत. उषा या मुलींना चांगली सुरक्षा कशी पुरवता येईल आणि त्यांना आपल्या पायावर कसे उभे करता येईल यावर काम करतात तर रणजितसिंह तंत्रज्ञान शिक्षणात आणले पाहिजे, अशी त्यांचा इच्छा आहे आणि त्यावर ते काम करतात.

युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूर येथील पारितेवाडी शाळेचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने उषा खरे यांना गौरविण्यात आले आहे.  


 ‘ग्लोबल टीचर प्राइझ’ (global teacher prize 2020)या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले लवकरच टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या सोबतच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या   उषा खरे देेेेखील शोमध्ये सहभागी होणार आहेत.
वाचा 

रणजितसिंह डिसले आणि उषा खरे यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी दोघांना या शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे.

'जेव्हा एक मुलगी शिकते त्यावेळी फक्त दोन घरं बदलत नाहीत तर त्यांचा आसपासची घरं देखील बदलतात', असं उषा खरे यांनी म्हटलं तर शिक्षणात तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं रणजितसिंह डिसले यांनी सांगितलं.

हा प्रोमो शेअर करताना लिहले आहे ज्ञानाचा संदेश प्रत्येक घरात पोहोचविला आणि शिक्षणाने संपूर्ण देश बदलला. 
कर्मवीर रणजित आणि उषाची कहाणी जाणून घ्या. शुक्रवारी रात्री 9 वाजता SONY वाहिनीवर. अमिताभ बच्चन व बोमन इराणी सोबत. पहायला विसरू नका.


उषा खरे यांच्याविषयी

2017 मध्ये उषा यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उषा यांनी सरकारी स्कूल हायटेक केले आहे. त्यांच्या शाळेतील मुली टॅबलेटच्या माध्यमातून अभ्यास करतात. शाळेचा संपूर्ण कोर्स टॅबलेटवर आहे. वृत्तानुसार, उषा ज्या शाळेत आहे त्या शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांना माइक्रोसॉफ्ट कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत.


रणजितसिंह डिसले यांचे विषयी

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या ‘ग्लोबल टीचर’ या पुरस्काराने सम्नानित करण्यात येणार आले. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. 7 कोटी रकमेचा हा पुरस्कार युनेस्को आणि वर्की यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला होता.

वाचा - 7 कोटींचा ZP गुरुजी - रणजितसिंह डिसले

रणजितसिंह डिसले यांनी राबविलेले सर्व उपक्रम सविस्तर माहिती सह जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 

रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. 



Post a Comment

0 Comments

close