Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Dress Code बाबत अजितदादा म्हणाले, '...ते जिन्स पँटचं चुकीचं झालं, आम्ही विचार करतोय'

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी/ कर्मचारी/ सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखा संदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी कामावर असताना कार्यालयात जिन्स,  टी शर्ट वापरु नये असे म्हटले आहे. तसेच गडद रांगाचे व चित्र विचित्र नक्षीकाम / चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत.


यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालून यावं, ही या मागची सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री साहेब हे मंत्रालयात टी शर्ट घालून येत नाही. घरी असले नंतर शर्ट घातलं तर ठीक आहे. जिन्स पँटचं चुकीचं झालं. बघू आम्ही त्याच्यावर विचार करतोय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
या निर्णयावर मा. रामदास आठवले यांनी सुद्धा टिका केली होती. यावर ते म्हणाले की आता मला मंत्रालयाची पायरी सुद्धा चढता येणार नाही. रामदास आठवले हे नेहमी जिन्स वापरत असलेले आपण नेहमी पाहतो. 

अजित पवार पुढे म्हणाले की, करोनाच्या काळात आपण कर्मचाऱ्यांच्या पगारावर १२ हजार कोटी रुपये खर्च करतोय. पेन्शन देतोय. लोकप्रतिनिधींच्या वेतनावर ३० टक्के कपात केलीय. काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्यांना या अडचणीच्या काळात मदत करणं ही सरकारची भूमिका आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments

close