Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी/ सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखा संदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना.

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी/ कर्मचारी/ सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखा संदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना...



(अ) सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्यास शोभनीय असा असावा.
(ब) महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार / चुडीदार कुर्ता, ट्राउझर पॅंट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा.
पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट व पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रांगाचे व चित्र विचित्र नक्षीकाम / चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करु नये.
ऐवजी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करु नये. असा बदल करण्यात आला आहे. 




हे ही वाचा 

(क) खादीला प्रोत्साहान देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

(ड) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व  निटनेटका असावा, याची दक्षता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी/ कर्मचारी/ सल्लागार यासह सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.

(इ) कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे विहित नमुन्यातील  कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर दिसेल असे लावावे. असे ओळखपत्र नियमितपणे धारण करणे आवश्यक आहे.

(ई) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा.
कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करु नये.
हे ही वाचा




Post a Comment

0 Comments

close