WhatsApp SWADHYAY लिंक व रिपोर्ट - WhatsApp स्वाध्याय उपक्रम इ.1ली ते इ.10वी तील विद्यार्थ्यांनी कसे व्हावे सहभागी..❓ स्वाध्याय रिपोर्ट कसा पहावा❓Step by Step Guide...
December 24, 2020
SWADHYAY लिंक - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana... महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) 'स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम अेसेसमेंट' (स्वाध्याय) योजनेची सुरुवात ३ नोव्हेंबरला करण्यात आली होती.
स्वाध्याय उपक्रम येत्या शनिवार पासून म्हणजेच दिनांक १७ जुलै २०२१ पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे. 4 सप्टेंबर आठव्या आठवड्यापासून इ. 1ली ते इ. 10वी पर्यंत स्वााध्याय सुरु.
सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.
१.नवीन विद्यार्थ्यांसाठी: वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात. Step by step Guide - Click Here
२.पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी -
१) आपल्या विभागाच्या लिंक ला टच करुन hello असा मेसेज पाठवा.
२) त्यानंतर आपल्याला आपली मागील इयत्ता मधील नाव / नावे दिसून येतील.
३) ज्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवायचा आहे त्याचा क्रमांक निवडा.
४) यानंतर त्या विद्यार्थ्याची वर्तमान (सध्याची) इयत्ता निवडा.
५)त्यानंतर शाळा बरोबर आहे का ते पहा जर बरोबर असेल तर 1 निवडा.
6) शाळा बदललेली असल्यास 2 पर्याय निवडून नवीन शाळेचा udise कोड टाका. नंतर शाळेचे नाव येईल बरोबर असल्यास 1 निवडा व स्वाध्याय सोडवायला सुरु करा.
विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता यावे या उद्देशाने सरकारने हा उपक्रम सुरू केला होता. यामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून पहिली ते १०वी पर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा घरच्या घरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'स्वाध्याय' हा उपक्रम मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्याचे एक साधन म्हणून वापरला जात आहे.
WhatsApp SWADHYAY उपक्रम
कोणासाठी - *१ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी* माध्यम - *मराठी, सेमी - इंग्रजी, उर्दू * विषय - मराठी, गणित व विज्ञान कधी - *दर शनिवारी.* विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.
*स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा.* 👇
*महत्वाची गोष्ट* - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.
करोनामुळे अचानक करण्यात आलेले लॉकडाउन आणि त्यामुळे बंद झालेल्या शाळा यामुळे एक संकट निर्माण झाले होते. पण शासनाच्या 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' उपक्रमातंर्गत शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्हींचा समावेश होता. त्यातच या स्वाध्याय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभारच लागला असे म्हणाव लागेल. भविष्यात स्वाध्याय 'युडायस' कोडशी जोडला जाणार आहे. त्यानुसार शिक्षक स्वतःच्या शाळेतील, वर्गातील विद्यार्थी यांची कामगिरी बघू शकतील आणि विद्यार्थ्यांना मदत करू शकतील. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले आहेत. लवकरच इतर माध्यमांचेही विषय सुरू करण्यात येणार आहे.
स्वाध्याय उपक्रमासंदर्भात काही शंका असल्यास अवश्य कमेंट करा. किंवा 9022226855 या नंबर ला WhatsApp message करा.
नमस्कार. स्वाध्याय उपक्रमाच्या pdf मधे चित्रावर आधारित प्रश्नांंचा समावेश असतो पण pdf मधे जो निरिक्षण करावयाचा भाग असतो तो चित्र स्वरूपात येत नाही.off line असणाऱ्या विद्यार्थ्यांना pdf print करतांना ही अडचण आहे।शिवाय सर्व इयत्तेच्या pdf उपलब्ध झाल्या तर offline पध्दतीने ग्रामीण भागातील मुलांकडून सोडवुन घेता येतील.
21 Comments
नमस्कार.
ReplyDeleteस्वाध्याय उपक्रमाच्या pdf मधे चित्रावर आधारित प्रश्नांंचा समावेश असतो पण pdf मधे जो निरिक्षण करावयाचा भाग असतो तो चित्र स्वरूपात येत नाही.off line असणाऱ्या विद्यार्थ्यांना pdf print करतांना ही अडचण आहे।शिवाय सर्व इयत्तेच्या pdf उपलब्ध झाल्या तर offline पध्दतीने ग्रामीण भागातील मुलांकडून सोडवुन घेता येतील.
Deleteइ. १ली ते इ. १०वी offline swadhyay PDF
http://bit.ly/Offline-whatsapp-swadhyay
Link वरील पोस्ट मध्ये दिलेली आहे.
DeleteYes
ReplyDeleteइ. १ली ते इ. १०वी offline swadhyay PDF
Deletehttp://bit.ly/Offline-whatsapp-swadhyay
Can student solve missed Swadhyay 1-17 ..if yes how plz guide
ReplyDeleteसर जर एखादा विद्याथ्याची दोन वेळा नोंदणी झाली तर तो विद्यार्थी स्वाध्याय मधून कसा कमी करायचा मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteकमी / बदल करता येत नाही. फक्त नवीन ॲड करु शकतो. काही चुकले असल्यास नवीन ॲड करा.
DeleteGreat performance
ReplyDeleteStudents name add hot nahi.
ReplyDeleteKahi chukly ter kay karave.how to add new name please guide.
Message on WhatsApp - 7588797587
DeleteWe can solved your all Question about WhatsApp swadhyay
Hello केल्या नंतर १ ते ३ press करा सांगितले.
ReplyDeleteआम्ही ३ select केले तर urdu भाषा दाखवते. आम्हाला english भाषा हवी आहे
आता पुढे कसे जायचे ते guide करा.
Message me on 7588797587
DeleteWhatsApp स्वाध्याय संदर्भात काही समस्या असल्यास अवश्य कमेंट करा. तुमची समस्या सोडविली जाईल.
ReplyDeleteआपल्या वर्गातील कोणत्या विद्यार्थ्यांने लिंक सोडविली हे त्याच्या नावासह कसे पाहायचे
ReplyDeleteनावासह यादी पाहता येत नाही. फक्त वर्गनिहाय संख्या समजते.
Deleteसर नमस्कार मेसेज टाकला होता तर १ते ४ पैकी नंबर टाका हाच मेसेज येतो आणि नंबर टाकला तरी परत तोच मेसेज येतो काय करावे?
ReplyDeleteटेस्ट सुरु आहे. 1 ते 4 पैकी एक अंक टाकून संपूर्ण टेस्ट सोडवा. Answersheet pdf आल्यानंतर नमस्कार असे टाका.
Delete27151314223
ReplyDelete9284666570
स्वाध्याय माला साठी रजिस्ट्रेशन करताना शिक्षकाने स्वतः विद्यार्थ्याला ऍड करायची आहे का?
ReplyDeleteप्रत्येक विद्यार्थ्यांने रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. जर विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुविधा नसेल तर शिक्षकांच्या मोबाईल वर रजिस्ट्रेशन करता येईल.
Delete