Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ लिंक https://aaplesarkar.mahaonline.gov.in

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांनी "आपले सरकार" (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) या संकेतस्थळावर नव्याने अर्ज सादर करुन डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र मिळविणेबाबत मुदतवाढ देण्यात आली आहे. 



शासन निर्णय :-

राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना भारतीय संविधानातील अनुच्छेद ३० (१) अनुसार ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन डिजिटल स्वाक्षरी असलेले धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही या विभागाकडून सुरु आहे. या विभगाच्या दि.२०.०२.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अल्पसख्यांक दर्जा प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी शासन निर्णयाच्या दिनांकापासून ६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. तथापि, सदर मुदत दि.२०.१०.२०२५ रोजी संपुष्टात येत असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संस्थांना मुदतवाढ देण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव विचाराधीन आहे.


भारतीय संविधानातील अनुच्छेद ३० (१) अनुसार राज्यातील अल्पसंख्याक संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही या विभागामार्फत करण्यात येते. राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्यासाठी दि.२७.०५.२०१३ च्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन ऑनलाईन अर्जाबाबतची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. अल्पसंख्याक दर्जा प्रदान करणेबाबतची सदर सेवा ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आली आहे. त्यामुळे सदर सेवा जुलै, २०१७ पासून आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


माहे जुलै, २०१७ पूर्वी ज्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनी ऑफलाईन दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतले आहे, अशा सर्व शैक्षणिक संस्थांना डिजीटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्यासाठी दि.२०.०२.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये ६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी दि.२०.०४.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१०२०१७५७०७२११४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी लिंक 

https://aaplesarkar.mahaonline.gov.in


अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close