Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळा व अंगणवाडीसाठी ग्रामपंचायतीला विशेष अनुदान शासन निर्णय

"ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीसाठी नवीन इमारत / खोली, जुनी इमारत / खोली दुरुस्ती, सीसीटीव्ही, संरक्षक भिंत, शौचालय बांधकाम यासाठी 03 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत निधी प्राप्त होणार शासन निर्णय दिनांकः 29 सप्टेंबर, 2026


जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत "ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" याबाबत दि.१६.९.२०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. शासन निर्णय २५.०१.२०१८ व २०.०७.२०२६ अन्वये जनसुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविण्यात आली असून सदर कामांना खर्चाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढविण्याची मागणी होत असल्याने काही नवीन कामांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय:-

"ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दि. २५.०१.२०१८ च्या शासन निर्णयामधील कामांमध्ये अ.क्र.१ (फ) नुसार खालील नवीन कामांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

  1. जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्र नविन इमारत बांधकाम /वर्ग खोली बांधकाम करणे - खर्च मर्यादा 20 लाख रुपये 
  2. जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्र जुन्या इमारत दुरुस्ती व रंगरंगोटी करणे खर्च मर्यादा 5 लाख रुपये 
  3. जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रांकरिता शौचालय बांधकाम / दुरुस्ती करणे. खर्च मर्यादा 3 लाख रुपये 
  4. जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रावर सोलर बसविणे व जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्र इमारत विद्युतीकरण करणे. खर्च मर्यादा 5 लाख रुपये 
  5. जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संरक्षण भिंत बांधकाम करणे. खर्च मर्यादा 5 लाख रुपये 
  6. जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व्हिडिओ निगराणी यंत्रणा (CCTV)/अग्नीशमन यंत्र स्थापित करणे. खर्च मर्यादा 3 लाख रुपये 




उपरोक्त कामे ही अन्य कुठल्याही योजनेत/विभागाकडून प्रस्तावित नसल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच कामांची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता कामे प्रस्तावित करताना घ्यावी.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०९२९१६३३२६५९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


"ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीसाठी विशेष अनुदान शासन निर्णय - 29 सप्टेंबर 2026 डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close