नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षण स्वरुप, कालावधी व वेळापत्रक
TET परीक्षेसाठी ज्या नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांनी सुट्टीची मागणी केली त्यांना परीक्षेच्या आधीच्या दिवशी दिनांक ०९/११/२०२४ व परीक्षे नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ११/११/२०२४ रोजी सुट्टी द्यावी. अशा नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचे दोन दिवसांच्या कालावधीत होऊ न शकणारे प्रशिक्षण, नियोजित प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर लगतच्या सलग दोन दिवसात पूर्ण करून घ्यावे. तसेच उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल याची दक्षता घेण्यात यावी. ( माननीय संचालक महोदय यांच्या मान्यतेने)
TET परीक्षेसाठी नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षणातून सवलत देणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस, (५० तासांचे) प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्यात येणार आहे.
नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम ( Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावरील सूचना
१) इयत्ता १ली ते ८वी व इयत्ता ९ वी ते १२ वी साठी नवनियुक्त शिक्षकांचे ०७ दिवसांचे प्रशिक्षण सोबत दिलेल्या वेळापत्रक व प्रशिक्षण घटकसंचाप्रमाणे आयोजित करण्यात यावे.
२) पहिले ६ दिवस इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ ते १२ वी ला शिकविणाऱ्या शिक्षकांचे समान घटकांचे एकत्रित प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. सातवा दिवस हा स्वतंत्र घटकांसाठी असेल.
३) वेळापत्रकांची Soft Copy या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
४) प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करावे.
५) आपल्या स्तरावर वर्ग संख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करावी व त्यांना प्रशिक्षण घटक संचातील समाविष्ट घटकांची माहिती करून द्यावी.
६) सुलभकांना संदर्भ साहित्याचे वाचन करण्यास सांगावे.
७) सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात द्यावयाचे असून सलग ०७ दिवसांचे राहील. प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय राहणार नाही. (रविवार वगळून).
८) सदर प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात दोन वेळचा चहा, कर्तव्य भोजन यांचा समावेश करता येईल. सदरचा खर्च समग्र TE Program Activity या लेखाशीर्षाखाली भागविण्यात यावा.
९) राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.
१०) आपल्या जिल्ह्यातील १००% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील, त्याअनुषंगाने आवश्यक ते समन्वय ठेवून यादी प्राप्त करून घ्यावी.
११) आपल्या मागणीप्रमाणे मार्गदर्शक पुस्तिका SCERT मार्फत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील.
१२) घटकसंचाची वाहतूक १८.१०.२०२४ पासून सुरु होईल व दिनांक २६.१०.२०२४ पर्यंत सर्व साहित्य संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी पोहोच होईल.
0 Comments