Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

झाड लावा, गुण मिळवा!

नाशिक: राज्यभराचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ग्रीन झोन वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक विद्यार्थी, एक झाड’ असा हा उपक्रम असून, विद्यार्थ्यांना झाड लावल्याबद्दल तसेच त्याची देखभाल करून ते वाढविल्याबद्दल गुणही दिले जाणार आहेत.


मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या संकल्पनेतून यंदापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी झाड लावलेल्या वर्षी त्याला ५ गुण दिले जाणार आहेत. तसेच झाडाची देखभाल करून ते वाढविल्याबद्दल त्याला दुसऱ्या वर्षी पुन्हा ५ गुण मिळतील. 

मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास साडेपाच ते सहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ५० टक्के विद्यार्थ्यांनी जरी या उपक्रमात सहभाग घेतला, तरी जवळपास अडीच ते तीन लाख झाडे राज्यभरात लावली जाणार आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ग्रीन झोन तयार करण्यासाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संदीप भागवत, कविता देव, भावना भऊरकर, प्रफुल्ल चिकनूर यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत विद्यार्थ्याने लावलेल्या झाडाची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे,
कृतार्थ जीवन या वृक्षांचे,
प्राणवायूचे कोष धरेचे !

वृक्ष म्हणजे जीवन - वृक्ष देतात फुले फळे !
वृक्ष देतात - पाउस, पाणी, थंडावा, वृक्षच देतात अन्न वस्त्र आणि निवारा !आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्ष शोषून घेतात वातावरणातला कार्बन.... त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लावण्यासाठी पुढे आलं पाहिजे ''आपण'' !! वृक्ष लावून...पृथ्वीला संजीवनी द्यायची आहे आपण. म्हणूनच - आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ घेऊन येतंय एक नाविन्यपूर्ण उपक्रम .... ''योसो'' अर्थात

जागतिक स्तरावर पर्यावरण विषयी केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये वृक्ष लागवड हा सर्वत्र प्राधान्य क्रमाने हाती घेतलेला उपक्रम आहे. असाच एक उपक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हाती घेतला आहे.

या उपक्रमाचे शीर्षक "य.च.म.मु.वी. – एक विद्यार्थी – एक वृक्ष" (YCMOU – One Student One Tree अर्थात YOSOT ) असे आहे.

कशी आहे योजना- एक विद्यार्थी - एक झाड  

या उपक्रमा अंतर्गत या विद्यापीठाचे विद्यार्थी प्रत्येकी एका वृक्षाची लागवड करतील. विद्यापीठाने या प्रकल्पासाठी विकसित केलेल्या मोबाईल एप्लिकेशनवर विद्यार्थी सदर लागवडीचे छायाचित्र अपलोड करेल. या छायाचित्रासह वृक्ष लागवडीच्या स्थळाची आपोआप नोंद होईल. त्यासाठी जी.पी.एस. प्रणालीचा तांत्रिक वापर केला जाईल. विद्यार्थी त्याने लागवड केलेल्या वृक्षाची जोपासना करेल. त्याची खात्री म्हणून तो दर महिन्यास विशिष्ट तारखेपूर्वी लागवड केलेल्या वृक्षाचे छायाचित्र अपलोड करेल. असे सलग सहा महिने जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या अंतिम परीक्षेच्या गुणांमध्ये प्रोत्साहन काही गुण दिले जातील.


Post a Comment

2 Comments

  1. कौतुकास्पद उपक्रम पृथ्वीला नवसंजीवनी देणारा उपक्रम.....

    ReplyDelete

close