Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

U-DISE plus प्रपत्रातील माहिती भरण्यासंदर्भात तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरुन कोणती कार्यवाही करावी?

सन २०२३-२४ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्यावत माहितीची आवश्यकता आहे. सदर माहिती अद्ययावत करताना तालुका व जिल्हा स्तरावरुन पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. 


U-DISE plus प्रपत्रातील माहिती भरण्यासंदर्भातील सर्वसामान्य सूचना वाचा. 


तालुकास्तरावरुन करण्यात येणारी कार्यवाही 

• सन २०२२-२३ या वर्षाची तालुक्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत सर्व त्रुटींची पूर्तता करुन माहिती अंतिम असल्याची खात्री झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र online पध्दतीने दि. २० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत अद्यावत करावी.

U-DISE प्रपत्रातील माहिती भरताना शाळा व केंद्र स्तरावर कोणती कार्यवाही करावी? पहा. 

• गटस्तरावर MIS Co-ordinator यांनी जिल्ह्याकडून मिळालेल्या युजरद्वारे गटातील सर्व शाळा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात याव्या / शाळांचा प्रवर्ग उच्चीकरणे करणे, व्यवस्थापन बदल करणे, इत्यादी आवश्यक ते बदल करून घेण्यात यावेत.

• गटस्तरावर MIS Co-ordinator यांनी प्रणालीमध्ये संगणकीकृत करण्यात येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करुन माहिती अंतीम करण्यात यावी. 

• शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या शाळेची माहिती स्वतःहून भरण्यास तयार उत्सुक असतील आणि त्यांच्याकडे Internet सुविधा उपलब्ध असेत तर त्यांना डाटा एन्ट्रीकरिता www.udiseplus.gov.in या संकेतस्थळावर माहिती नोंदविण्याकरिता MIS Co-ordinator यांनी यूजर मॅनेजमेंट या सुविधेमधून शाळेचा स्वतंत्र युजर नेम व पासवर्ड तयार करून द्यावा.

Login - U-DISE Plus युनिफाईड जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (यु-डायस+) ऑनलाईन भरण्यासाठी लिंक Click Here


U-DISE Plus  2020-21 कोरा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here. 

U-DISE plus 2021-22 कोरा फॉर्म डाउनलोड करा.- Click Here

• तालुकास्तरावर MIS Co-Ordinator किंवा डाटा एन्ट्री ऑपरेटर कार्यरत नसल्यास त्या तालुक्यातील सर्व शाळांची माहिती संगणकीकृत करण्याची जबाबदारी नजिक असलेल्या तालुक्याच्या MIS Co-ordinator / डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचेकडे सोपविण्यात यावी.

• तालुक्यातील सर्व शाळांची माहिती प्रणालीमध्ये संगणकीकृत झाल्यानंतर  तालुकास्तरावरील MIS Co-ordinator / डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी तालुक्यातील सर्व शाळांची माहिती तालुकास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना योजनेचे नियोजन करण्याकरिता तसेच माहिती पडताळणी करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरुन अचूक माहिती भारत सरकारकडे सादर करता येईल व PGI मध्ये जिल्ह्याच्या शैक्षणिक अंकामध्ये वाढ होईल.


जिल्हास्तरावरुन करण्यात येणारी कार्यवाही 

• जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी यु डायस प्लस प्रणालीमध्ये संकलित करण्यात येणाऱ्या सर्व शाळा प्रणालीमध्ये समाविष्ट करुन घेण्याची कार्यवाही करावी व जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती दि. २५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत पूर्ण होईल याप्रमाणे आपल्यास्तरावर नियोजन करण्यात यावे.

• नव्याने सुरु होणाऱ्या सर्व नवीन शाळा तसेच डायसमध्ये समाविष्ट नसलेल्या शाळांचा शोध घेऊन त्याची नोंद प्रणालीमध्ये करण्यात यावी.

• जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती प्रणालीमध्ये संगणकीकृत झाल्यानंतर जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना योजनेचे नियोजन करण्याकरिता तसेच माहिती पडताळणी करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात यावी. जेणेकरुन अचूक माहिती भारत सरकारकडे सादर करता येईल.

• जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी सर्व शाळांची माहिती प्रणालीमध्ये भरुन झाल्यानंतर त्या माहितीमधील त्रुटीची पूर्तता पूर्ण करून घ्यावी. सर्व शाळांची माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या स्वाक्षरीने माहिती अंतिम असल्याचे प्रमाणपत्र विहीत नमुन्यामध्ये ऑनलाईन करून त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी.

• जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी PGI च्या अनुषंगाने सर्व मुद्दांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये प्राप्त होणाऱ्या माहिती तपासून घेण्यात यावी जर त्यांच्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्यांची पुर्तता करुन घेण्यात यावी जेणेकरुन जिल्ह्यांच्या शैक्षणिक निर्देशांक वाढेल.

• जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी राज्य कार्यालयास ऑनलाईन पध्दतीने माहिती सादर करण्यापूर्वी सदरची सर्व तालुक्यांची समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या, डिजीटल शाळांची माहिती, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, कॉम्प्युटर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती, स्वच्छतागृह बांधकाम विषयक माहिती, विद्युत सुविधा, व्यावसायिक शिक्षण शिक्षक प्रशिक्षण, २५% प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती, समग्र शिक्षा योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा तपशिल, School Sefty बाबतची माहिती ही जिल्हा व तालुकास्तरावरील विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजन करण्याकरिता उपलब्ध करुन द्यावी आणि सर्व माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर राज्याला Online पध्दतीने माहिती सादर करण्यात यावी.


राज्यस्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 


• संदर्भिय पत्रान्वये जिल्ह्याती सर्व शाळांची माहिती ऑनलाईन पदधतीने भरण्याची कार्यवाही पूर्ण करून दि. ३१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मा. राज्य प्रकल्प संचालक, मप्राशिप, यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र भारत सरकारकडे ऑनलाईन व ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल,

• राज्यस्तरावर यु-डायस प्लस प्रणालीमध्ये प्राप्त झालेल्या माहितीचे मागीलवर्षीच्या माहितीवरुन तपासून त्रुटींची पूर्तता कार्यवाही करण्यात येईल, व अंतिम झालेली माहितीनुसार विविध योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments

close