Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

U-DISE Plus प्रपत्रातील माहिती भरण्यासाठी सर्वसामान्य सूचना

U-DISE Plus - Unified District Information System for Education.  U-DISE  Plus प्रपत्रातील माहिती भरण्यासाठी सर्वसामान्य सूचना अवश्य वाचा. 


U-DISE प्रपत्रातील माहिती भरताना शाळा व केंद्र स्तरावर कोणती कार्यवाही करावी? पहा. 

U-DISE प्रपत्रातील माहिती भरताना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर कोणती कार्यवाही करावी? पहा. 

जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकार मार्फत ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील इ.१ली ते इ.१२वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती संकलित करुन संगणीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हा स्तरावरुन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक) यांचे मार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुबंई याचे कार्यालयास सादर करण्यात येते. अंतिम झालेल्या यु डायस प्लस नुसार भारत सरकारकडून PGI निर्देशांक व निती आयोगाकडून SEQI निर्देशांक निश्चित करण्यात येणार आहेत.

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 2022-23 कसे कराल❓ संपूर्ण माहिती. नमूना कोरे फॉर्म ३ व प्रश्ननिहाय गुणदान कसे कराल ❓ action plan पहा.

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन कसे करावे ❓mscert pune आयोजित ऑनलाईन सत्र Video पहा. 


U-DISE Plus प्रपत्रातील माहिती भरण्यासाठी सर्वसामान्य सूचना 


1. शाळेचे U-DISE Plus प्रपत्र ऑनलाईन भरण्याचे / नवीन शाळेला यु-डायस क्रमांक मिळण्यासाठी संकेतस्थळ 

http://udiseplus.gov.in

2. शाळेचा देण्यात आलेला कोड नंबर इंग्रजी अंकात ठळकपणे भरावा.

3. प्रपत्रामध्ये जिथे कोड दिलेला आहे ते कोड इंग्रजी अंकात ठळकपणे लिहावे व जिथे माहिती अक्षरामध्ये  विचारलेली आहे तिथे ती माहिती इंग्रजी भाषेमधून कॅपिटल अक्षरामध्ये लिहावी.

4. सर्व विद्यार्थ्यांची माहिती जनरल रजिस्टर वरून घेण्यात यावी.

5. सर्व माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनीच लिहिणे व प्रमाणित करणे आवश्यक आहे.

6. शाळा मुख्याध्यापकांनी प्रपत्राचे अगोदर काळजीपूर्वक वाचन करावे आणि अभिलेखांच्या आधारे करावयाच्या नोंदी कच्च्या स्वरूपात स्वतंत्रपणे करून त्यानंतर केंद्र प्रमुखांना भरुन दयाव्यात.

7. फॉर्मवर शाळेचा U-DISE कोड क्र. व शाळेचे नाव तपासून नंबर ठळकपणे लिहिला असल्याची खात्री करावी.

8. प्रपत्र केंद्रप्रमुखाकडून प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी चार दिवसाच्या आत प्रपत्र पूर्णपणे भरून केंद्रप्रमुखांकडे सादर करावे.

9. प्रपत्रातील तक्ता क्र. 4.2, 4.4 व 4.5 या मधील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या सारखी असावी.

10. शाळेतील सर्व शिक्षकांची कार्यरत पदे प्रपत्रामध्ये अचूक नमूद करावी व प्रपत्रातील शिक्षकाची सर्व माहिती ही शिक्षकांच्या सर्व्हिस बुकांवरून घेण्यात यावी.

11. शक्यतो कोणतीही खाडाखोड करू नका. ज्या माहितीत दुरुस्ती करावयाची आहे तेथे लाल शाईच्या पेनाने वर्तुळ करून अशी (x) खोडून बाजूला दुरुस्तीची नोंद करावी.

 12. सूचनेचे तंतोतंत पालन करून योग्य जागी योग्य माहिती पर्यायाचा कोड नंबर लिहा.

13. सर्व मुद्दयांची नोंद करणे व माहिती पूर्णपणे लिहिणे आवश्यक आहे.

14. शाळेच्या मुख्यध्यापकांनी प्रपत्रात व ऑनलाईन सर्व माहिती भरल्यानंतर स्वयंघोषित प्रमाण पत्र संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

Login - U-DISE Plus युनिफाईड जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (यु-डायस+) ऑनलाईन भरण्यासाठी लिंक Click Here

U-DISE Plus 2020-21 कोरा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here. 

U-DISE plus 2021-22 कोरा फॉर्म डाउनलोड करा.- Click Here

Post a Comment

0 Comments

close