Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

U-DISE plus प्रपत्रातील माहिती भरण्यासंदर्भात शाळा व केंद्र स्तरावरुन कोणती कार्यवाही करावी?

सन २०२३-२४ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्यावत माहितीची आवश्यकता आहे. सदर udise मधील माहिती अद्ययावत करताना शाळा व केंद्र स्तरावरुन पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. 


U-DISE plus प्रपत्रातील माहिती भरण्यासंदर्भातील सर्वसामान्य सूचना वाचा.शाळास्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 

• शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या युजरनेम व पासवर्ड द्वारे शाळेतील बदल झालेल्या सोयीसुविधांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. माहिती प्रणालीमध्ये अद्यावत करणे पूर्ण झाल्यानंतर माहिती अचूक असल्याचे Self Declaration प्रमाणपत्र Upload करावे.

• यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सन २०२२-२३ या वर्षाची शाळेतील सर्व सोयीसुविधांची माहिती भरून ऑनलाईन पध्दतीने सादर केलेली आहे. सन २०२२-२३ या वर्षाकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या युजरनेम व पासवर्डद्वारे सोयीसुविधांमध्ये बदल झाल्यास, विद्यार्थी संख्येत बदल झाले असल्यास, शिक्षकांच्या माहिती मध्ये बदल असल्यास त्याच माहितीमध्ये बदल करण्यात यावा व इतर माहिती पुन्हा यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविण्याची गरज नाही.

• शाळेच्या मुध्यापकांनी शाळेची माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर School Report Card व भरलेले यु-डायसचे प्रपत्र माहितीसाठी डाऊनलोड करुन घ्यावे.

• शाळेची माहिती भरताना मुख्याध्यापकांना अडचणी येत असल्यास त्यांनी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी राज्य जिल्हा / तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर / MIS Co-ordinator / Data Entry Operator यांच्या मदतीने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती नोंदविण्याचे काम पूर्ण करून घेण्यात यावे. 

U-DISE प्रपत्रातील माहिती भरताना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर कोणती कार्यवाही करावी? पहा. 


केंद्र स्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 

• केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये मुख्याध्यापकामार्फत नोंदविल्याची माहिती खात्री करून घ्यावी. 

• केंद्र प्रमुखांनी यु-डायस प्लस प्रणालीमधली माहिती अचूक, वस्तुनिष्ठ, त्रुटीविरहीत, प्रपत्रातील सर्व माहिती PGI मधील सर्व माहिती अचूक भरण्याकरिता त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करावे. 

• मुख्याध्यापकांना ऑनलाईन पध्दतीने माहिती भरण्यास अडचणी येत असल्यास त्यांच्या अडचणी समजून घेवून गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सोडविण्यात याव्यात. 

Login - U-DISE Plus युनिफाईड जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (यु-डायस+) ऑनलाईन भरण्यासाठी लिंक Click Here


U-DISE Plus  2020-21 कोरा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here. 

U-DISE plus 2021-22 कोरा फॉर्म डाउनलोड करा.- Click Here


Post a Comment

0 Comments

close