विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान त्यांना मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाने एक ई-परीक्षा (e-pareeksha portal) पोर्टल लॉन्च केले आहे.
देशात कोरोना महामारीचा संसर्ग पुन्हा नव्याने वाढला आहे. रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. वाढत्या कोरोना महामारीमुळे परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या सर्व शंका निरसन करण्यासाठी cbse board ने ई-परीक्षा पोर्टल सुरु केले आहे. तसेच कोरोना महामारी ची परिस्थिती लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी केला आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ असताना दुसरीकडे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान त्यांना मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाने एक ई-परीक्षा (e-pareeksha portal) पोर्टल लॉन्च केले आहे. cbse.gov.in या वेबसाईटवर हे पोर्टल देण्यात आले आहे. (CBSE board launch E pariksha portal for CBSE exam 2021 know all detail information)
ई-परीक्षा पोर्टलमुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात हाहा:कार उडाला आहे. हा विचार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यावर भर देण्यात आला. येत्या 4 मेपासून सीबीएसई बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होणार आहेत. त्याआधी बोर्डाने 2021 या शैक्षणिक वर्षात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-परीक्षा पोर्टल लॉन्च केलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थांना परीक्षा देण्यासाठी मदत होईल.
हे ही वाचा - दिल्लीतील सरकारी शाळेमध्ये आता cbse ऐवजी दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम - मुख्यमंत्री केजरीवल
विद्यार्थ्यांना असे वापरता येईल ई-परीक्षा पोर्टल
विद्यार्थ्यांनी ई-परीक्षा पोर्टल या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती मिळू शकेल. आपला युजर आयडी, पासवर्ड आणि सिक्योरिटी पिन टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना हे पोर्टल वापरता येईल. तसेच परीक्षेसंदर्भात आल्यानंतर त्या-त्या सेक्शनमध्ये जाऊनसुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या अडचणींचे समाधान मिळवता येऊ शकेल.
Useful for students 👇
E-pariksha Portal वर लॉगीन करण्यासाठी येथे टच करा.
पोर्टलचे वेगवेगळ्या भागात वर्गीकरण
विद्यार्थ्यांना हे पोर्टल वारण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून, ई-परीक्षा पोर्टलचे (e-pareeksha portal) अनेक भाग करण्यात आले आहेत. या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र, प्रॅक्टिकल केंद्रात बदल करण्यात येईल. याच पोर्टलवर 10 वीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनल असेसमेंट (CBSE Internal Assessment) आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनल ग्रेड (CBSE Internal Grade) अपलोड केले जातील. यासह परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांच्या रोल नंबरनुसार यादी देखील अपलोड केली जाईल. ई-परीक्षा पोर्टल (ई-परीक्ष पोर्टल) अनेक भागात विभागलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा वापर करणे सुलभ होईल.
सीबीएसई बोर्डाने हे ई-परीक्षा पोर्टल सुरु केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्यांच्या परीक्षेसंदर्भातील सर्व अडचणींचे समाधान याच पोर्टल वर सापडणार आहे.
0 Comments