महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune) यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या १०वी, / १२वीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट (SSC / HSC students hall ticket) मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. हे हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा सन 202३ चे अंतिम वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
बारावी परीक्षा 2023 प्रवेशपत्र / Hall Ticket
यंदा १२वी ची लेखी परीक्षा ही २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. (दहावी व बारावी च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कशा होतील? पहा.) या परीक्षेचे प्रवेशपत्र मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रवेशपत्र शुक्रवार (२७ जानेवारी २०२३) पासून कॉलेज लॉगीन (College Login) मध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास माध्यमिक शाळांंनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असेही बोर्डाने म्हटलं आहे.
Download HSC Board Exam 2023 Hall Ticket - Click Here
तणावाचे व्यवस्थापन - दहावी बारावी च्या परीक्षेतील तणावाचे व्यवस्थापन कसे कराल❓mscert पुणे व हार्टफुलनेस ट्रस्ट चे मार्गदर्शन video पहा.
प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
दहावी बोर्ड परीक्षा 202३ प्रवेशपत्र
यंदा 10वी ची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. (दहावी व बारावी च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कशा होतील? पहा.) या परीक्षेचे प्रवेशपत्र मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रवेशपत्र (6 फेब्रुवारी २०२३ रोजी दु. 3:00वा) पासून स्कूल लॉगीन (School Login) मध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास माध्यमिक शाळांंनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असेही बोर्डाने म्हटलं आहे.
Download SSC Board Exam 2023 Hall Ticket - Click Here
ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देणेबाबत शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना
- मार्च-एप्रिल २०२३ परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता १२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावीत.
- प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
- प्रवेशपत्रात विषय व माध्यम यामध्ये काही चुका असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
- 🖥 इयत्ता १२वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विषयनिहाय शंका समाधान
- प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे.
- 🖥 इयत्ता १०वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विषयनिहाय शंका समाधान
- प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांला प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
- फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करायची आहे.
- नवनीत अपेक्षित प्रश्नसंच व कृती पत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
0 Comments