ओळखतील का पिल्ले मलाशाळेत मला पाहिल्यावरबिलगतील का पहिल्यासारखेवर्गात मी गेल्यावर||१||
पहिली तून दुसरीत गेले पाटी मात्र कोरीच राहिली नाही झाले अंकज्ञान अक्षर ओळखही नाही झाली||२||
लेखन नाही वाचन नाहीकाय सांगू साहेबांनाकसले ऑनलाईन कसले ऑफलाईनपर्याय नाही शिक्षकांना||३||
पुन्हा एकदा देवा त्यांचा हात हातात धरू दे मांडीवरती पाटी ठेवून नाव त्यांचे गिरवू दे||४||
कित्येकांना अनाथ केलेकिती जण पोरके झालेसंकट समोर पाहून तू हीतुझे दार लावून घेतले||५||
तुझीच ना रे लेकरे सारी सांग कुणाकडे पाहायचे रिती सारी झोळी झाली अश्रू कुठे रे ढाळायचे||६||
संकट सारे दूर कर होऊन तू आमची ढाल नव शैक्षणिक वर्षाचे हेच दान पदरी घाल||७||
🌹🌹🌹🌹
C&P WhatsApp
कविता, कवि, कवयित्री, कवी, साहित्य संपदा,
0 Comments