Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ. 10 वी मूल्यमापनासाठी Excel Sheet व मूल्यमापन करण्यासाठी बोर्डाच्या वतीने मार्गदर्शन you tube live

खाली दिलेल्या लिंकद्वारे उद्या दिनांक 10 जून रोजी सकाळी 11 वा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने राज्यातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी Youtube च्या माध्यमातून मुल्यमापन विषयी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.....

इ. 10वीच्या मूल्यमापनाविषयीचे बोर्डाचे परिपत्रक (09.06.2021) डाउनलोड करा. - Click Here


10 वी मूल्यमापनासाठी excel sheet  डाउनलोड करा. - Click Here 

मूल्यमापनाविषयी मार्गदर्शन Live 👇


You tube Live खालील लिंक ला टच करा. 

http://mh-ssc.ac.in/faq


Share with your friend's

मूल्यमापनासाठी निकाल समिती गठीत करणे

मूल्यमापनाबाबत मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही

निकाल तयार करण्यासाठी कार्यपध्दती 

अ. नियमित विद्यार्थ्यांसाठी

ब. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी

क. खाजगी विद्यार्थ्यांसाठी (नियमित) 

ड. तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी

इ. श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ट विद्यार्थी




कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक, वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०बी) परीक्षा उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये रद्द करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा रद्द केल्यामुळे, परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील, असेही उपरोक्त शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा तपशील जाहीर केलेला आहे.

मूल्यमापनासाठी निकाल समिती गठीत करणे


● माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे कमाल निकाल समिती गठीत करण्यात आली असेलच नसल्यास तात्काळ गठीत करावी. ०७ सदस्यांची • समितीने बैठक घेऊन मंडळाच्या कार्यवाहीच्या वेळापत्रकाप्रमाणे समितीच्या कामकाजाची रुपरेषा ठरवावी.

● समितीने शाळेतील इ.१० वी ला अध्यापन केलेल्या सर्व विषय शिक्षकांची व वर्ग शिक्षकांची बैठक घेऊन शासन निर्णयातील तरतूदीनुसार मूल्यमापनाची कार्यपध्दती स्पष्ट करावी. तसेच सर्व शंकांचे निरसन करावे व वेळोवेळी मार्गदर्शन करावे.

• वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या विद्यार्थीनिहाय संकलित निकालाचे परीक्षण व नियमन समितीमार्फत करण्यात

• समितीने शासन निर्णयातील निकषानुसार निकालाचे परीक्षण व नियमन अभिलेख / कागदपत्रांच्या आधारे करुन विद्याथ्र्यांचे विषयनिहाय गुण अचूक असल्याची खात्री करून निकाल स्वाक्षरीसह प्रतीत प्रमाणित करावा,

● समितीने प्रमाणित केलेला निकाल संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे सुपूर्त करावा.

मूल्यमापनाबाबत मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही


अ. इयत्ता १०वीचे विषय शिक्षक, वर्ग शिक्षक व पर्यवेक्षक यंत्रणा यांची बैठक घेऊन शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे. त्यातील निकष व कार्यपध्दती समजून घेऊन सर्वकष चर्चा करावी व सर्व शंकांचे निरसन करावे.

ब. मंडळाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्प्याचे कामकाज वेळेत पूर्ण करावे. 

क. मंडळाकडे परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरुन नोंदणी केलेल्या व मंडळाचे बैठक क्रमांक प्राप्त झालेल्या मूल्यमापन करण्यात यावे.

ड. नियमित विद्याथ्र्यांप्रमाणेच पुनपरिक्षार्थी, खाजगी विद्यार्थी (संपर्क केंद्रामधील), तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांच्याबाबतीत संबंधित विषय शिक्षक व वर्ग शिक्षक यांच्याकडून मूल्यमापनाबाबत कार्यवाही करुन घेण्यात यावी.

इ. समितीने प्रमाणित केलेला निकाल मंडळाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार संगणक प्रणालीमध्ये नोंदवावा.

उ. नियमित विद्यार्थ्यांच्या बाबतीत समितीने प्रमाणित केलेल्या इ. १० वीच्या संकलित निकालाची एक मूळ प्रत आणि .९वीच्या संकलित निकालाची एक मूळ प्रत सिलबंद पाकीटात मुख्याध्यापकांच्या अभिरक्षेत ठेवून दुसरी प्रत (इ. ९वी व इ.१०वी) संबंधित विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत जमा करावी.

खाजगी विद्याथ्र्यांच्या बाबतीत त्याने यापूर्वी इयत्ता ५वी ते ९वी यापैकी ज्या इयत्तेची अंतिम परीक्षा पूर्ण केली असेल त्या परीक्षेच्या अंतिम निकालाची प्रमाणित प्रत उपरोक्तप्रमाणे विभागीय मंडळास सादर करावी.


निकाल तयार करण्यासाठी कार्यपध्दती 


अ. नियमित विद्यार्थ्यांसाठी


इ. ९वीचा अंतिम निकाल, इ.१०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ. १० वीचे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्याथ्र्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात यावे. सदर गुणदान करताना शासन निर्णयातील सर्व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात

इयत्ता ९वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय १०० पैकी प्राप्त गुणांचे शाळा स्तरावर ५०/

टक्के गुणांत रुपांतर करताना अपूर्णांकात आलेले गुण पुढील पूर्ण गुणात रुपांतरीत करावेत. (उदा. १३.०००१३ १३.०१०१४, १३.५००१४, १३.५१-१४) 


ब. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी


(i) काही विषयांसाठी प्रविष्ट पुनर्परीक्षार्थी (नियमित व खाजगी पुनर्परीक्षार्थी)

सदर विद्याथ्र्यांच्या बाबतीत मूल्यमापन करताना यापूर्वीच्या मंडळाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांचे सरासरीने ८० पैकी गुणांत रूपांतर मंडळाच्या संगणक प्रणाली मार्फत करण्यात येईल. आणि ते गुण प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेसाठी देण्यात येतील.

सन २०२०-२१ मध्ये ज्या विषयासाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाला असेल त्या विद्यार्थ्यांचे इ.१०वीचे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन यामध्ये विषयनिहाय प्राप्त झालेले २० पैकी गुण देण्यात येतील.

श्रेणी विषयामध्ये अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी निश्चित करावी.

यासाठी ८२.०१ मधील नमुन्यात विद्यार्थ्यांची यापूर्वी उत्तीर्ण विषयांच्या परीक्षेचे वर्ष, महिना आणि बैठक क्रमांक (विषयनिहाय) इ. तपशील भरावा,


नियमित पुनर्परीक्षार्थ्याच्या बाबतीत विद्यार्थ्यास इ.९ बीमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी आणि खाजगी पुनर्परीक्षाव्यांच्या बाबतीत यापूर्वीच्या अंतिम इयत्तेत (इ.५वी ते इ. ९वी) मध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी

क. खाजगी विद्यार्थ्यांसाठी (नियमित) -


संपर्क केंद्रामार्फत संपर्क शिबिरामध्ये अथवा अन्य कालावधीत आयोजित केलेल्या सराव चाचण्या पूर्ण केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक वा अधिक बाबीसाठी विषयनिहाय प्राप्त झालेल्या गुणांचे ८० पैकी गुणात रुपांतर करावे.
इ. १० वीच्या अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे २० पैकी प्राप्त होणारे गुण नोंदविण्यात यावे.

खाजगी विद्यार्थ्यांने यापूर्वी उत्तीर्ण केलेल्या अंतिम परीक्षेमध्ये (इ.५वी ते इ. ९वी यापैकी अंतिम) प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी/श्रेणी नोंदविण्यात यावी.

प्रथम भाषा द्वितीय भाषा / संयुक्त भाषा तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, दिव्यांग विद्याथ्र्यांच्या विषय योजनेतील अन्य विषय तसेच श्रेणी विषय यासाठी विषय व विद्यार्थीनिहाय स्वतंत्र गुणदान करावे. विषय शिक्षकांनी सदर गुणांची/श्रेणींची नोंद परिशिष्ट ३.०१ ते ३.०९ (विषयनिहाय लागू होणारे परिशिष्ट) मधील नमुन्यात दोन प्रतीत करावी व त्याच्या स्वाक्षरीत प्रती वर्गशिक्षकांकडे देण्यात याव्या.

विषय शिक्षकांकडून प्राप्त झालेल्या विषयनिहाय गुणांचे/श्रेणींचे विद्यार्थीनिहाय संकलन वर्ग शिक्षकांमार्फत दोन प्रतीत करण्यात यावे. त्यासाठी विहित नमुन्यातील परिशिष्ट पी ०१ ते पी ०४ (विषय योजनेनुसार लागू होणारे परिशिष्ट) वापरावे. सदर संकलित निकाल वर्गशिक्षकांनी स्वाक्षरीत करुन मुख्याध्यापकांकडे जमा करावा.

उपरोक्त माहिती मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी.


ड. तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी


राज्य मंडळ व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मूल्यमापन करताना यापूर्वीच्या मंडळाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचा विषयनिहाय तपशील व प्राप्त झालेले गुण /श्रेणींची नोंद परिशिष्ट ४.०१ मध्ये करण्यात यावी.

यापूर्वीच्या मंडळाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांचे सरासरीने ८० पैकी गुणांत रुपांतर मंडळाच्या संगणक प्रणाली मार्फत करण्यात येऊन सदरचे गुण प्रविष्ट तुरळक विषयांच्या लेखी परीक्षेसाठी देण्यात येतील. मंडळाच्या संगणक प्रणाली मार्फत करण्यात येईल. आणि ते गुण प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेसाठी देण्यात येतील.


सन २०२०-२१ मध्ये ज्या तुरळक विषयांसाठी विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाला असेल त्या विद्यार्थ्याचे इ.१०वीचे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन यामध्ये विषयनिहाय प्राप्त झालेले २० पैकी गुण देण्यात येतील.

उपरोक्तप्रमाणे विद्यार्थीनिहाय संकलन वर्ग शिक्षकांनी दोन प्रतीत तयार करुन स्वाक्षरीसह मुख्याध्यापकांकडे जमा करावे.


इ. श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ट विद्यार्थी


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ साठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे तसेच मंडळाच्या प्रचलित तरतूदीनुसार श्रेणीसुधार योजनेतंर्गत पुढील परीक्षेमध्ये संधी असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे या परीक्षेचे निकाल तयार करण्यात येणार नाहीत.

Post a Comment

0 Comments

close