Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

11 वी प्रवेशाच्या CET साठी 26 जुलै पासून नवीन संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरु...अशी होईल CET....प्रवेश प्रक्रिया व परीक्षेचे स्वरुप जाणून घ्या.

शैक्षणिक वर्ष सन 2021-22 साठी इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा CET घेण्यात येणार आहे. 26 जुलै पासून या परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यात येतील. 

अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्यात किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाईल. त्यासाठी 26 जुलै पासून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना Online फॉर्म भरता येतील.
  • महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या  या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना हे अर्ज Online पद्धतीने भरता येतील. 
  • अर्ज करण्यासाठी येथे टच करा. Click Here
  • ही परीक्षा Offline पद्धतीने होणार आहे. 
  • विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कुठे असेल हे नंतर सांगण्यात येतील.
  • पोर्टल वर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना आपला बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल.
  • नंतर परीक्षा द्यायची की नाही असे दोन पर्याय दिले जातील.
  • त्यातील योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावयाचा आहे. 


11 th CET syllabus -

शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करा 👇👇



अशी होईल 11वी प्रवेश प्रक्रिया

इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.

11 वी प्रवेश परीक्षा CET साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  नवीन वेबसाइट - Click Here. 

महत्त्वाचे - 

1) इ. 1ली ते इ. 12वी साठी डी डी सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम 14 जून पासून सुरु.... प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा.


इयत्ता 11 वी प्रवेशासाठी अशी होईल CET परीक्षा... 

१. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असेल. 

२. सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या राज्य मंडळ, C.B.S.E., C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येईल.

३. सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. 

४. सदर परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील, परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल, परीक्षा O.M.R. आधारीत असेल.

५. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.

वाचा - शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य

६. सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त शिक्षण यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत घोषीत करण्यात येईल. 

७. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी पूर्णत: ऐच्छिक असल्याने; इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यासाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय (option) उपलब्ध करुन देण्यात येईल. 

८. सन २०२० २१ या शैक्षणिक वर्षासाठी इ. १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी इ. १० परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. तथापि, C.B.S.E. C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून / परीक्षा परिषदेकडून विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागेल.

९. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान घोषीत होण्याची अपेक्षा आहे. सामाईक प्रवेश परीक्षा इयत्ता १० वीच्या निकालानंतर २ आठवड्यांमध्ये सुमारे जुलै महिनाअखेर अथवा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा आयोजित करण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणान्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी.

दहावी/बारावी नंतरचे करिअर पर्याय वाचा -

महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती. 


इ. 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षेचे स्वरुप

१) सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल. 

२) परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. 

२) इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील. 

३) परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. 

४) प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. 

५) परीक्षा O.M.R. आधारीत असेल.

Post a Comment

1 Comments

close