Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासकीय कार्यालयामध्ये भ्रमणध्वनी वापरताना पाळावे लागणार हे शिष्टाचार.

अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा (Mobile / Cell Phone) वापर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये भ्रमणध्वनीचा (Mobile / Cell Phone) वापर करताना अधिकारी / कर्मचारी यांनी पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत आज दि. 23 जुलै रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे.

अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा (Mobile / Cell Phone) वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि भ्रमणध्वनीचा वापराबाबत करत असताना काही वेळा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते. सबब शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

मोबाईल वापरताना पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


शासकीय कार्यालयामध्ये भ्रमणध्वनी वापरताना हे शिष्टाचार पाळा.

१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.

२. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.

३. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.

४. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.

५. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा. 

शिक्षकांसाठी शालेय आवारात / वर्गात मोबाईल वापरण्यास परवानगी देण्याबाबतचा शासन निर्णय पहा. 

६. भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.

७. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.

८. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी, कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.

९. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी silent / vibrate mode वर ठेवावा.

१०, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, ear piece / ear phone वापरणे अशा बाबी टाळाव्यात.

११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये.

Post a Comment

0 Comments

close