Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

YCMOU B. Ed. शैक्षणिक वर्ष 2022-24 साठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात YCMOU BEd online application start for the academic year 2022-24

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-24 साठी बी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

 YCMOU BEd 2022-24 जाहिरात डाउनलोड करा. - Click Here

Telegram Channel जॉईन करा. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-24 साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे. YCMOU BEd साठी ऑनलाईन अर्ज 5 मे पासून करता येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मे पर्यंत आहे. त्यानंतर 27 मे ते 31 मे या कालावधीत अर्जाचे स्वयं संपादन करावयाचे आहे.  YCMOU BEd ला अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा. तसेच DEd DTEd कोर्स पूर्ण केलेला असावा. 

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

YCMOU BEd ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल? 


1) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
2) ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
3) ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्यास आपण ycmou च्या help desk शी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या.
4) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास वरील लिंक वरुन ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.

YCMOU BEd prospect माहिती पत्रक 2022-24 - Click Here

YCMOU BEd prospect/माहिती पत्रक 2021-23 - Click Here



YCMOU ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती
  • प्रवेशासंदर्भातील निवडीशी संबंधित माहिती / सूचना विद्यापीठ वेबसाईटवर वेळोवेळी जाहीर करण्यात येईल. संबंधितांनी त्यासाठी नियमितपणे वेबसाईटला भेट द्यावी.
  • प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, परिनियम तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि 2021-23 तुकडीच्या माहितीपुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपणास बंधनकारक असेल.
  • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेशअर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
  • ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर आपणास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. याबाबत आपल्या कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार विद्यापीठ करणार नाही.
  • प्रवेशासंदर्भातील सर्व विवाद नाशिक न्यायिक कार्यकक्षेच्या अंतर्गत असतील.

Post a Comment

0 Comments

close