राज्यातील 40,000 शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा (MH TET) घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा TET 2021 अंतरिम उत्तरसूची जाहीर डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
दोन वर्षानंतर MAHA TET परीक्षा
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. 2018-19 मध्ये शेवटची परीक्षा झाली होती.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा.
परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता
कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी 7 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे 10 लाख यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.
महा टीईटी परीक्षा दोन गटात
साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. दोन्ही गटांसाठी सुद्धा परीक्षा देता येते.
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF इ. 2री ते इ. 10वी (45 दिवस) daily updated
Bridge Course PDF for Std 2 - Std 10
सेमी इंग्रजी - Bridge Course सेमी इंग्रजी PDF डाउनलोड करा.
सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.





0 Comments