Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

11th admission link 2026 | 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27- https://mahafyjcadmissions.in/ | विभागनिहाय नोंदणी लिंक, सुधारित वेळापत्रक | cut of list and vacancy list | प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक पहा...

शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी FYJC / 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 10 एप्रिल पासून सुरुवात. विद्यार्थी नोंदणी सुरु, प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या. 11वी ऑनलाईन प्रवेश लिंक - https://mahafyjcadmissions.in/

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा निकाल जाहीर - Click Here



11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिल पासून सुरु करण्यात येणार आहे. 

11वी ऑनलाईन प्रवेश लिंक - https://mahafyjcadmissions.in/

11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/



शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत शासन निर्णय 27 एप्रिल 2026 - Click Here


सन २०२६-२७ पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इ. ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ०६ मे २०२५ याद्वारे अधिक्रमीत करण्यात येत असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी :-

अ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :-

(৭) राज्यातील सर्व क्षेत्रांकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.

(२) राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागू राहतील.

(३) शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात यावे. तसेच शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून HSVC व्यावसायिक चे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने शाळा स्तरावर होतील. शालेय शिक्षण विभागाच्या व्यतिरिक्त आदिवासी विभाग, सामाजिक न्याय व अन्य विभागाच्या राज्य मंडळ संलग्नित शाळांच्या विभाग प्रमुखांनी मान्यता दिल्यास अशा शाळा या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. ही परवानगी त्या त्या विभागाने दिनांक ३० एप्रिल पूर्वी देणे अनिवार्य असेल.

(४) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न उच्च माध्यमिक शाखा यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरीष्ठांना उपलब्ध करून द्यावेत, तसेच विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे आवश्यक राहील. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे आवश्यक राहील, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल.

शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत शासन निर्णय 27 एप्रिल 2026 - Click Here



मुंबई, ठाणे, रायगड जिल्हे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील परिभाषित सहा ऑनलाइन प्रवेश क्षेत्रांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू आहे.  महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे, कारण सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केले जातील. 

सदर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची उपयोगीता व व्यवहार्यता लक्षात घेवून तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये असलेल्या EASE OF LIVING या उद्दिष्टान्वये विद्यार्थी व पालकांचे जीवनमान सुखकर बनविणे व याकामी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम याचा अपव्यव टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्यात येणार आहे. 


11वी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात शासन निर्णय व परिपत्रके 2026-27


अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in

ई-मेल आयडी - support@mahafyjcadmissions.in

हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४.


11वी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात शासन निर्णय व परिपत्रके 2025-26


शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत शासन निर्णय 6 मे 2025 - Click Here

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यभर राबविणेबाबत सविस्तर सूचना शासन निर्णय 25 फेब्रुवारी 2025 डाउनलोड करा. - Click Here

राज्यातील ग्रामीण आणि शहरी सर्वांसाठी ऑनलाईन प्रणालीशिवाय अन्य कोणत्याही प्रणालीद्वारे प्रवेश होणार नाहीत.

हे प्रवेश सुकर होण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर सनियंत्रण समिती काम करणार आहे.

राज्य सरकारने अद्याप दहावीच्या निकालांची तारीख जाहीर केली नसली, तरी अकरावी प्रवेशासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना केवळ १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येणार आहेत.

राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये व शाळांमध्ये अकरावी प्रवेश यंदा ऑनलाइन पद्धतीने केले जातील, असा निर्णय शासनाने घेतला. याबाबतच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरता येणार आहेत. या प्राधान्यक्रमातील पहिल्या क्रमांकावर नमूद केलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला त्याच्या निकालाच्या आधारे प्रवेश मिळाला, तर त्याला तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असेल. 

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11वी चे प्रवेश हे https://mahafyjcadmissions.in/ या पोर्टल च्या माध्यमातून केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात.


11th admission 2025, 11वी प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे.

1- Student Registration, 

2- Application Form Part-I, 

3-Option Form Part-II

लॉगीन ID हा विद्यार्थ्यांचा दहावी परीक्षेचा सीट नंबर असेल. 

Student Registration link

11वी प्रवेश :- वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे FAQ's*
👇 *काही महत्त्वाचे प्रश्न*

* कोण-कोणत्या माध्यमाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात?

* ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का?

* नोंदणी नंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का?

* प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

* *जर मी इयत्ता १० मध्ये १-२ विषयांमध्ये नापास झालो आहे तर मी इ.११ वी प्रवेशासाठी अर्ज करू शकतो का?*

* कोटा प्रकार कोणते आहेत?

* जर मी प्रथम पसंतीचे विद्यालय मिळून देखील प्रवेश निश्चित केला नाही तर काय होईल?

* ऑफलाईन पेमेंट चा पर्याय उपलब्ध आहे का?

* प्रवेश प्रक्रियेमधून माघार घेण्यासाठी काय येईल?

* मी माझ्या प्रवेश अर्जातील शाखेची निवड (Stream) बदलू इच्छितो तर?


11वी प्रवेश - वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे PDF  डाउनलोड करा. - Click Here

FAQ's for 11th admission PDF download - Click Here



11वी प्रवेशाचा फॉर्म कसा भरावा❓ User Manual डाउनलोड करा. Click Here


11th admission Help Desk

Helpline Number : 8530955564 (9:00 AM to 7:00 PM)

E-mail - support@mahafyjcadmissions.in



11वी ऑनलाईन प्रवेश लिंक - https://mahafyjcadmissions.in/

11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/


11वी प्रवेशा संदर्भात useful video

Video 1 -

11th admission part 1 & 2 fill English Demo

https://youtu.be/AhaCA33fftk


Video 1 - 

11वी प्रवेश part 1 & 2 भरणे मराठी डेमो 

https://youtu.be/na7EEmup2hg?si=8SSXQIQX3qSnBtRn


Video 2 - 

11वी प्रवेश part 1 & 2 सोप्या पद्धतीने भरणे 

https://youtu.be/rRo_GmBU3Js



11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/



 

11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/



प्रवेश यादी जाहीर झालेनंतर विद्यार्थी व कॉलेज यांनी प्रवेशासाठी काय करावे? video पहा. 

Students activities after allotment.
(11th Admission)

Jr. Colleges activities after allotment
(11th Admission)


11th admission timetable 2026-27

08 मे 10 मे - विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग 1 भरुन पूर्ण करणे.

11 ते 13 मे - अर्जाचा भाग 2 भरुन अर्ज सबमिट करणे.

14 मे ते 15 मे  - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे

16 मे - हरकती नोंदविणे.

18 मे ते 19 मे - अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार

19 मे - शून्य फेरी प्रवेश :- गुणवत्ता यादीनुसार कॉलेज वाटप

19 मे - वाटप केलेल्या महाविद्यालयाची यादी प्रसिद्ध करणे, पहिली यादी कट ऑफ जाहीर करणे. 

20 मे - प्रवेश निश्चित करणे, पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य


20 मे - कॅप राऊंड - प्रवेश निश्चिती संदर्भात सूचना PDF 

20 मे - पहिल्या फेरीसाठी रिक्त जागा घोषित करणे


CAP फेरी 1 व कोटा प्रवेश 

20 मे ते 21 मे - अर्ज भाग 2 भरणे.

23 मे ते 26 मे - अलॉटमेंट प्रोसेस 

26 मे - कॉलेज वाटप व विद्यार्थ्यांना संदेश 

26 मे ते 28 मे - प्रवेश निश्चिती करणे किंवा रद्द करणे

29 मे - रिक्त जागा घोषित करणे.

30 - दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे.


पहिली फेरी प्रवेश वेळापत्रक व सूचना 2026-27 

शून्य फेरी प्रवेश व कॅप राऊंड प्रवेशा संदर्भात महत्त्वाच्या सूचना PDF - Click Here


Post a Comment

1 Comments

  1. खरोखर अप्रतिम माहिती आहे.दिलेल्या वेळापत्रकात काही बदल होतो की त्याचं पद्धतीने प्रक्रिया पार पडत असते सर

    ReplyDelete

close