26 नोव्हेंबर "संविधान दिन" साजरा करणेबाबत परिपत्रक | संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. Constitution Day - 26th November various activities
भारतीय संविधान उद्देशिका / प्रस्तावना PDF डाउनलोड करा.
संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास/ निबंध लेखन
संविधान दिन - स्वरचित काव्यलेखन
दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन (संविधान दिवस) म्हणून साजरा केला जातो, जो भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब अआंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या मसुदा समितीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत केले व दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली.
संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारताचे संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे मूळ स्तंभ असून त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मानवमूल्ये अंतर्भूत आहेत. या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखणे.
संविधान दिन - पोस्टर निर्मिती / घोषणा
विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनसोबत मिळून-मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभरात राबविण्यासाठी सामंजस्य करार केला असून पुढील ५ वर्षांमध्ये राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये जो मूल्याधारित शिक्षणाचा प्रयत्न केला जातो, त्याला संविधान दिनाच्या उपक्रमांद्वारे अधिक बळकटी मिळते. या दिवशी घेण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे आत्मसात आणि आचरण करण्याची प्रत्यक्ष संधी देतात, ज्यामुळे मूल्यवर्धनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.
तदनुषंगाने २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शाळांनी पुढील कार्यक्रम / उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत, ज्यात संवैधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतील. अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा दिवस ठरेल.
संविधान दिनानिमित्त आयोजित करावयाचे उपक्रम व स्वरूप
१. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
उद्दिष्टे : १. विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेची ओळख करून देणे.
२. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत मूल्यांचे महत्त्व समजावून देणे.
३. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व अभिमान निर्माण करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी :
शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करावे.
उद्देशिकेतील महत्त्वाच्या संकल्पनांचा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अर्थ स्पष्ट करावा.
विद्यार्थ्यांना या मूल्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्याची संधी द्यावी.
2) उपक्रमाचे नावः संविधान दिन प्रभात फेरी
उद्दिष्टेः-
१) विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे,
२) नागरिक म्हणून कर्तव्यभावना विकसित करणे.
३) समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यांसह फलक तयार करावेत.
शाळेपासून गाव किंवा परिसरात प्रभात फेरी काढावी.
फेरीदरम्यान घोषवाक्ये, देशभक्तीपर गीते सादर करावीत.
3) उपक्रमाचे नावः- संविधान व्याख्यानमाला / सेमिनार / चर्चासत्र
उद्दिष्टेः
१) विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून देणे.
संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास
२) संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची ओळख करून देणे.
३) विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासासाठी प्रेरित करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
संविधान अभ्यासक, प्राध्यापक किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करावे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्राची व्यवस्था करावी.
व्याख्यानानंतर थोडक्यात चर्चासत्र घ्यावे.
4) उपक्रमाचे नावः संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा
उद्दिष्टेः
१) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे.
२) संविधानाच्या मूल्यांबद्दल कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे,
३) दृश्यकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंगलबजावणी:-
स्पर्धेचे विषय ठरवावेत (उदा. "आपले संविधान आपला अभिमान").
आवश्यक साहित्याची व्यवस्था करावी.
निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावावीत.
5) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा (Quiz Competition)
उद्दिष्टेः
१) विद्यार्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढवणे.
२) गटाने कार्य करण्याची सवय लावणे.
३) स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
संविधानाशी संबंधित प्रश्नसंच तयार करणे.
गट किंवा वर्गनिहाय स्पर्धा घेणे.
विजेत्या गटांना प्रमाणपत्र व बक्षीस देणे,
6) उपक्रमाचे नावः संविधान विषयक पथनाट्य
उद्दिष्टेः-
१) समाजात संविधानिक मूल्यांची जनजागृती करणे,
२) विद्यार्थ्यांमध्ये नाट्याद्वारे अभिव्यक्ती कौशल्य विकसित्त करणे.
३) सामाजिक समरसतेचा संदेश देणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण द्यावे व सराव करवून घ्यावा.
शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करावे.
नाटकामधून संविधान दिनाचा संदेश द्यावा.
7) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित पोवाडा / गाणी सादरीकरण
उद्दिष्टेः
१) लोककलेच्या माध्यमातून संविधानाबद्दल अभिमान निर्माण करणे.
२) ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती विकसित करणे.
३) राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः
विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित पोवाडे, गाणी शिकवणे.
शाळेच्या कार्यक्रमात सादरीकरण करणे,
सर्वोत्तम सादरीकरणास पारितोषिक देणे.
8) उपक्रमाचे नावः मानवी साखळी निर्मिती व सामाजिक ऐक्य उपक्रम
उद्दिष्टेः-
१) विद्यार्थ्यांना एकता, बंधुता व सामूहिक जबाबदारी या मूल्यांचा अनुभव देणे.
२) विविधता असूनही एकत्र राहण्याचे महत्त्व समजावून देणे.
३) सामाजिक ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः-
शाळा प्रांगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांनी हातात हात घालून साखळी तयार करावी.
"आम्ही भारताचे लोक" या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात करावी.
साखळीदरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करावे.
या उपक्रमातून एकता, समानता व बंधुता या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करावे.
9) उपक्रमाचे नावः सेल्फी पॉईंट " I love Constitution":
उद्दिष्टेः-
१) विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडणे.
२) सकारात्मक प्रचाराद्वारे संविधान दिन लोकप्रिय करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
शाळेत "संविधान दिन सेल्फी पॉईंट तयार करावा.
विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रतीक, भारतीय ध्वजासह छायाचित्रे घ्यावीत.
"माझा देश-माझा अभिमान" सारखे घोषवाक्य वापरावे.
10) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित हस्तकला व प्रतिकृती निर्मिती स्पर्धाः-
उद्दिष्टेः-
१) विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याला वाव देणे,
२) संविधानातील प्रतिके, चिन्हे यांची ओळख करून देणे.
३) सृजनशील माध्यमातून देशभक्ती जोपासणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांना संविधानाची उद्देशिका, संसद भवन, संविधानाची प्रतिकृती किंवा संविधानाशी संबंधित इतर शैक्षणिक साहित्य तयार करण्यास प्रोत्साहित करावे.
तयार केलेल्या प्रतीकांचे प्रदर्शन शाळेत भरवावे.
विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित मॉडेल्स तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे.
11) उपक्रमाचे नावः ११. 'माझे संविधान, माझे कर्तव्य' अनुभव व अभिव्यक्ती उपक्रम -
उद्दिष्टे :
1) विद्यार्थ्यांना संवैधानिक मूल्यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडण्यास मदत करणे.
२) स्वतःच्या वर्तनातून मूल्यांचे आचरण करण्याची जाणीव निर्माण करणे.
३) जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी :
विद्यार्थ्यांना 'मी समतेचा आदर कसा करतो?', 'मी इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर कसा करतो?', 'मी माझ्या वर्गात बंधुता कशी जपतो?' अशा विषयांवर विचार मांडण्याची संधी द्यावी.
विद्यार्थ्यांकडून संवैधानिक मूल्ये आचरणात आणण्यासाठी वैयक्तिक संकल्प करून घ्यावेत.
वर्गामध्ये प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांवर आधारित चर्चा घडवून आणावी.
उपरोक्त प्रमाणे शाळास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत करावे. सदरउपक्रमाच्या अंमलबजावणीतून शासनाचे धोरण व संवैधानिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन होईल याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन (SMF) मार्फत जिल्हा कार्यक्रम समन्वयक व तालुका समन्वयक आपणांस आवश्यक ते सहकार्य करतील.
अहवाल सादरीकरण :
संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा जिल्ह्याचा एकत्रित अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ०५ डिसेंबर, २०२६ पर्यंत सादर करावा. तसेच सर्व शाळांनी https://the-octopus.com/api/sanvidhanForm या लिंकवर संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती भरावी.
26 नोव्हेंबर - संविधान दिन 2026 साजरा करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here









0 Comments