Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास / संविधानाचा इतिहास निबंध लेखन मराठी

संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास / संविधानाचा इतिहास निबंध लेखन

भारतीय राज्यघटनेचा प्रवास हा अत्यंत खडतर असा झाला आहे. ब्रिटीश पंतप्रधानांनी स्वतंत्र होत असलेल्या भारतासाठी घटना असावी यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार 6 डिसेंबर रोजी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 


६ डिसेंबर १९४६ : संविधान सभेची स्थापना करण्यात आली. फ्रेंच राज्य घटनेवर आधारित या सभेची स्थापना करण्यात आली. 

९ डिसेंबर १९४६: रोजी संविधान सभेतील पहिली बैठक झाली. या संविधान सभेला संबोधित करणारे पहिली व्यक्ती जे बी. कृपलानी. या सभेचे सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष झाले. (वेगळ्या राज्याची मागणी करत मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला.)

११ डिसेंबर १९४६: संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष, हरेंद्रकुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि बी. एन. राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले. 

१३ डिसेंबर १९४६ : जवाहरलाल नेहरूंनी एक 'वस्तुनिष्ठ ठराव' सादर केला आणि मूलभूत तत्त्वे मांडली. हीच नंतर राज्यघटनेची प्रस्तावना ठरली.

२२ जानेवारी १९४७ : वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

२२ जुलै १९४७ : नवा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला.

१५ ऑगस्ट १९४७: भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. 

२९ ऑगस्ट १९४७ : संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉ. बी. आर. आंबेडकर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले. समितीचे अन्य सदस्य मुन्शी, मुहम्मद - सदुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, एन. माधवराव यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिलेल्या बी. एल. मित्तर यांची जागा घेतली.

या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या. १३ फेब्रुवारी १९४8 रोजी या समितीने घटनेचा मसुदा अध्यक्षांना सादर केला. पुढं हा मसुदा जनतेच्या विचारार्थ खुला ठेवण्यात आला.

१६ जुलै १९४८: हरेंद्रकुमार मुखर्जी यांच्याप्रमाणेच, टी. टी. कृष्णम्माचारी यांना विधानसभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले.

भारतीय जनतेनं मसुदा समितीला सात हजार ५३५ सूचना सादर केल्या. त्यातील काही सूचना रद्द ठरवून दोन हजार ४७३ सूचनांवर सविस्तरपणे चर्चा घडविण्यात आली आणि त्या रास्त सूचना स्वीकारण्यात आल्या. ही चर्चा १४४ दिवस चालली. ४ नोव्हेंबर १९४९ रोजी चर्चेची प्रक्रिया सुरू होती.

25 नोव्हेंबर 1949 : घटनेचा सुधारित मसुदा तयार करून समितीनं २५ नोव्हेंबरला सादर केला. त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं समितीसमोर समारोपाचे भाषण झालं.

२६ नोव्हेंबर १९४९ : भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेने संमत आणि मंजूर केले. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करतात. 

२४ जानेवारी १९५० : संविधान सभेची अखेरची बैठक. ३९५ लेख, ८ अनुसूची व २२ भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली.

२६ जानेवारी १९५०: २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली आणि भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. 

अशारितीनं राज्यघटना समितीची प्रक्रिया पूर्ण झाली.

Join WhatsApp group

https://chat.whatsapp.com/Iol8Moq7xhR22ScWtC9t4o



या प्रक्रियेस २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले.

या प्रक्रियेस एकूण ६४ लाख रुपये खर्च झाले. 

संविधान निर्मितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. 

Post a Comment

0 Comments

close