Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

11वी cet परीक्षा रद्द - मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.


11 वी प्रवेश प्रकिया कशी होणार होती? 

इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या  टप्यामध्ये  सामाईक  प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या  उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार होता.

11 वी CET परीक्षा कशी होईल? परीक्षेचे स्वरुप / तसेच प्रवेश प्रक्रिया कशी होईल? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. 

11वी CET साठी महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम

ही CET परीक्षा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असून यामध्ये इंग्रजी 25, गणित 25, विज्ञान 25 व समाजिक शास्त्र 25 असे एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतील. यासाठी इयत्ता 10वीचा महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करावा लागणार असल्याने cbse  व icse  बोर्डात अध्ययन  करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे कठिण होणार होतेे.  त्यामुळे केंद्रीय मंडळांच्या पालक आणि इतर संघटनांकडून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.

काय होता आक्षेप? 

सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही. त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.

मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेशाबाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आज झाली. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

कशी होईल 11वी प्रवेश प्रक्रिया? 

11वी CET परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर 11 वी प्रवेश प्रक्रिया आता इयत्ता दहावीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. 
 

Post a Comment

1 Comments

close