झाड या शब्दावरुन कविता तयार करा.
कविता - झाड (2)
झाड आहे हिरवेगार
वारा देते थंडगार
झाडाच्या सावलीत मी बसते
झाड खुदकन गालात हसते
झाड देते माया
झाड देते छाया
झाडावर भरते पक्ष्यांची शाळा
झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा
झाडाला लागतात सूंदर फुले
फुले तोडायला येतात मुले
झाड आहे माझा मित्र
मनी माझ्या नेहमी झाडाचे चित्र
यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि शालेय शिक्षण मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
https://kutumbapp.page.link/p8HNm6mBZfwaHpnR7
कविता - झाड (1)
झाड आमुचा मित्र
झाड आमुचा सखा
उगाच देत नाही, कधी कुणाला धोका
झाड लावा छान
राखा त्यांचा मान
नको पडू दे कधी फळा फुलांची वान
झाडें लावा खूप
बदलूया धरणीचे रूप
कधीच नाही होणार जमिनीची धूप
निसर्गाकडे जाऊया
झाडांची निगा राखूया
झाडांची सेवा कधीच जाणार नाही वाया
झाड म्हणजे जीवन
प्राणवायुची खाण
जिवसृष्टीला मिळालेले हेच खरे वरदान
हेच खरे वरदान
0 Comments