Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Student Portal update | स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक.

सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या माहितीत, ज्या विद्यार्थ्याच्या प्रवर्ग व जात विषयक माहिती मध्ये "not known" नोंदविलेले असेल किंवा माहितीच भरलेली नसेल अशा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची व जात विषयक माहिती पूर्ण करावयाची आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अपूर्ण आहे, त्यांची आधारबाबतची माहिती देखील पूर्णपणे नोंदवावयाची आहे. सदरची कार्यवाही संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या स्टुडंट पोर्टलच्या लॉगीन वरून करावयाची आहे. त्यासाठी आता जिल्हानिहाय वेळापत्रक देण्यात आले आहे. आधार अपडेट करणे संदर्भात विभागनिहाय वेळापत्रक PDF डाउनलोड करा - Click Here
शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
तरी आपणास विनंती आहे की, आपल्या विभागातील अधिनस्त सर्व जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (न.पा./म.न.पा.) यांना कळवून त्यांचे कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळेशी संपर्क साधून प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती अद्यावत करून घ्यावी. सदर कामकाज महत्त्वाचे व कालमर्यादीत असल्याने सर्व नागरी तसेच ग्रामीण भागांमधील शाळेची स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्याच्या वरील सर्व माहिती विहित मुदतीत कशी पूर्ण होईल असे पहावे. तसेच सदर कार्यवाही पूर्ण झाल्याचा अहवाल कृपया संचालनालयास सादर करावा.

Post a Comment

0 Comments

close