देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान कविता लेखन मराठी. Thank A Teacher Teachers Day #teachersday2021 शिक्षक कार्य गौरव सप्ताह 2021.
Thank A Teacher - देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान निबंध लेखन मराठी
Thank A Teacher - आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदलती भूमिका निबंध लेखन मराठी
कवितेचे नाव : शिक्षक
शिक्षक म्हणजे काय असतात ?
उजेडाचा गाव असतात
ज्ञानामृत पाजणारे
विद्यार्थ्यांचा देव असतात ॥१॥
शिक्षक म्हणजे काय असतात ?
विद्यार्थ्यांचा मित्र असतात
गरजूवंत, गुणवंताच्या
डोक्यावरचे छत्र असतात ॥२॥
शिक्षक कधी छडी असतात
शिक्षक कधी गोडी असतात
विद्यार्थ्यांना पैलतीरी
सोडणारी होडी असतात ॥३॥
विद्यार्थी येतात, विद्यार्थी जातात
शिक्षक मात्र तेथेच राहतात
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये
स्वतःची स्वप्ने पाहतात ||४||
कविता लेखन, काव्य लेखन, स्वरचित कविता.
1 Comments
कविता के लेखक
ReplyDelete