देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान निबंध लेखन मराठी. Thank A Teacher Teachers Day #teachersday2021 शिक्षक कार्य गौरव सप्ताह 2021.
आपल्या देशाला गुरु-शिष्याची महान परंपरा आहे. संपूर्ण जगाला ज्ञान व संस्कृतीचे धडे देणारी गुरुकुल शिक्षण पद्धती ही भारतीय संस्कृतीचा महान ठेवा आहे. गुरुकुल शिक्षण पद्धतीत जगभरातून अनेक विद्यार्थी भारतीय गुरुकुलांमध्ये शिक्षण घेत. गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलेले विदयार्थी पुढे देशाच्या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका पार पाडीत असत आणि आजही आधुनिक युगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काळात भारतीय शिक्षण परंपरेत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व देश विकासाचे माध्यम मानले जाते आणि देशाच्या जडणघडणीच्या या प्रक्रियेत शिक्षकांचे मोलाचे योगदान असते.
Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓
एकेकाळी भारताची ओळख ही विश्व गुरु, म्हणून होती. भारताने जगाला अनेक बुद्धीवंत दिले आहेत. वर्तमानात विदयार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन शिक्षकच पार पाडीत आहे.
शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विदयार्थी असून शिक्षक हा दिशा दाखविणारा, सुविधा पुरविणारा, सुविधा निर्माण करून देणारा सुविधादाता आहे. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री नेहमी म्हणायचे की, "शिक्षक हा राष्ट्राचा कणा आहे.” भारताचे पूर्व राष्ट्रपती व विख्यात शास्त्रज्ञ " डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी, " भारताला महासत्ता बनवायचे असेल तर, शिक्षकच त्याचे प्रेरक माध्यम ठरू शकतात!" असे गौरवोद्गार शिक्षकांविषयी काढले होते. याचाच अर्थ वर्गाच्या चार भिंतीमध्ये शिकणारी ही पिढी भावी काळात देशाचे नेतृत्व करत आपले स्वकर्तृत्व सिद्ध करणार असल्याने देशाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.
Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट तिसरा इ. 9वी ते इ. 12वी
मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या भवितव्यात शिक्षक आणि शिक्षिकांचा मोठा अन् बहुमोल वाटा असतो, शिक्षक मुलांना घडवताना त्याची ज्ञानलालसा पूरी करतात. त्यांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. शिक्षक मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर घरी, समाजात कसं रहायचं कसं वागायचं काय करायचं, काय करू S नये ह्याचा जीवन पाठ देतात. मुलांमधल्या गुप्त कलागुणांना बाहेर काढतात. त्या गुणांना खतपाणी घालून वाढवतात. विकसित करतात. भावी जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देतात. त्या चिमुकल्या पंखात गरुड भरारी घेण्याचं सामर्थ्य, शक्ती, बळ व आत्मविश्वास जागवतात.
सामाजिक मानसिकता बदलविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. नैतिकता आणि मुल्य हे शिक्षणाच्या माध्यमातून विदयार्थ्यांच्या मनात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करतात. शिक्षण ही समाजात जीवन व समाज परिवर्तन घडवणारी एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच व्यक्तीला चांगल्या आणि वाईट यांमधील भेद समजतो. चांगले शिक्षक ही देशा साठी सक्षम पिढी तयार करत असतात. विदयार्थ्यांना संवेदनशीलता आणि प्रतिष्ठा यांच्या आघाडीवर घेऊन जाण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागते. शिक्षकांना जागा निर्माण करावी लागते आणि अध्ययन वातावरण तयार करावे लागते.
एकूणच शिक्षक हे देशाचा कणा आहेत. हे लालबहादूर शास्त्रींचे वाक्य सार्थक ठरते. कारण शिक्षकाकडे वर्गात असलेली पिढी हीच पुढे देशाचे भवितव्य निश्चित करीत असते. म्हणूनच देशाच्या उज्ज्वल प्रपरेत व देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे... धन्यवाद !!!



0 Comments