Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदलती भूमिका निबंध लेखन मराठी

सामाजिक परिवर्तनात शिक्षकाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असते. शिक्षणाच्या सर्वच स्तरावर गुणवत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षणाची गुणवत्ता ठरविण्याचे परिणाम म्हणजे त्यातून निर्माण होणारी गुणवान पिढी होय. ही पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतो. या संदर्भात आंतरराष्ट्रीय शिक्षण आयोगाचे (डेलार आयोग) म्हणणे महत्त्वपूर्ण वाटते.


"In any event, no reform can succeed without the co-operation and active participation of teachers." - Delor's Commission.

शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता निश्चित करणे व त्या विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे असा प्रवाह नव्याने शिक्षणक्षेत्रात येत आहे. शिक्षक हा शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या प्रक्रियेतील सर्वात प्रभावी घटक मानला जातो. त्यादृष्टीने शिक्षकांमधील विषयज्ञान अध्यापनकौशल्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इ. क्षमता वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. राष्ट्रनिर्माण व राष्ट्रविकासाचे कार्य करताना शिक्षकाला विविध भूमिका पार पाडाव्या लागतील व त्यासाठी काळानुरूप विविध क्षमता स्वतःत वाढवाव्या लागतील.

Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓

आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदलती भूमिका

१. मूल्यसंवर्धन करणारा

शिक्षकाने प्राथमिक स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत मूल्यसवर्धकाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडणे शिक्षकाच्या आचारसंहितेनुसार अनिवार्य आहे. शिक्षकांच्या आचरणात नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असेल तर चारित्र्यसंपन्न विद्यार्थी निश्चित घडतील. केवळ भौतिक प्रगतीने जीवनाती सर्वच सुखसमाधान मिळवता येत नाही. म्हणूनच विद्यायांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाबरोबर नैतिक मूल्यांची रुजवण व संवर्धन शिक्षकाला करावे लागते. शिक्षणाच्या माध्यमातून लोकशाहीला पोषक नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षकाला वैयक्तिक व सामाजिक मूल्यांचा विकास व संवर्धन करावे लागते ही भूमिका बजावताना त्याला नित्यनूतन आधुनिक तंत्रज्ञानाच्या संशोधनाचाही आधार घ्यावा लागतो.

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट तिसरा इ. 9वी ते इ. 12वी

२. मानवी संबंध विकसित करणारा

व्यक्तीचा विकास समाजातून होतो तर समाज व्यक्तीच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण करतो. प्रत्येक समाजाचा सांस्कृतिक वारसा जपणान्या समाजासाठी समाजवादी नागरकि निर्माण करून मानवी संबंधाना महत्व देणारा नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते. समाजामध्ये मानवी संबंध विविध कार्यक्रम ाच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्यासाठी भूमिका शिक्षकाला बजावावी लागते. शिक्षण व समाज हे परम्परावलंबी असून शिक्षणामध्येच संस्कृतीची मूल्ये व परंपरा हा सांस्कृतिक वारसा एक पिढीतून दुसन्या पिढीकडे संक्रमित करण्याचे सामर्थ्य आहे. हे समजून घेऊन मानवी संबंध जोपासण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते.

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट दुसरा इ. 6वी ते इ. 8वी


3. व्यक्तिस्वातंत्र्याचा उपासक

प्रत्येक अध्ययनकर्ता हा महत्वपूर्ण व्यक्ती आहे ही व्यक्तिमत्त्वाची संकल्पना शिक्षकाने कायम लक्षात ठेवावी. आजची शिक्षणपद्धची ही विद्यार्थीकेंद्रीत असल्याने प्रत्येक वयोगटातील विद्याथ्र्यांचे मानसशास्त्र लक्ष घेऊन शिक्षकाला अध्यापनाचे कार्य करावे लागते. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळे प्रत्येक विद्याथ्र्यांचा प्रथम व्यक्ती म्हणून आदर करून त्याच्या विकासासाठी आवश्यक त्या कृती करताना प्रत्येक अध्ययनकर्त्याला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या प्रकारे शिक्षकाने व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करून त्याचे उपासक बनावे

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट पहिला इ. 1ली ते इ. 5वी


४. विविध ज्ञानशाखांकडे समन्वय साधणारा विशेषज्ञ

विविध स्तरावर शिक्षक म्हणून कार्य करताना त्याला विविध ज्ञानशाखांमधील ज्ञानाचा विद्यार्थ्याच्या सर्वागिण विकासासाठी उपयोग करावा लागतो. या ज्ञानशाखांमधील अद्ययावत ज्ञान ग्रहण करताना शिक्षकाच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा कस लागतो. या ज्ञानशाखांमधील लिखित आणि अलिखित साहित्याचा वापर करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ बनविण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते. अध्यापन उत्कृष्ट होऊन ते चिरकाल टिकण्यासाठी शिक्षकाला उत्तर ज्ञानशाखांतील ज्ञानाचा समन्वय साधता आला पाहिजे. तरच तो आपल्या विद्यार्थ्यांना प्रगत ज्ञान देण्यास पात्र ठरेल. विविध ज्ञानशाखा व त्यातील अद्ययावत ज्ञान यांची माहिती असण्याबरोबरच तिचा वापर करण्याचे कौशल्यही शिक्षकाला अवगत असणे गरजेचे आहे.

५. व्यवसाय मार्गदर्शक व समुपदेशक

अध्यापनाबरोबर शिक्षणातून मनुष्यबळ निर्माण व्हावे याकरिता शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर शिक्षकाला व्यवसाय मार्गदर्शक म्हणूनही महत्वपूर्ण भूमिका बजावावी लागते. विद्यार्थ्याच्या क्षमता आणि अभिरूची ल घेऊन त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करावे लागते. त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा, कुमारावस्थेतील अध्ययनाध्यांनी पालकाशी कसे जुळवून घ्येवे यासंदर्भात वैयक्तिक समुपदेशन करावे लागते.


६. समाजपरिवर्तन

शिक्षण हे समाजिक विकास व परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षणाची उद्दिष्ट्ये ही राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन ठरविली जातात. शिक्षणातून ही उद्दिष्टे प्रत्येक स्तरानुसार शिक्षकाला साध्य करावी लागतात. यासाठी प्रत्येक स्तरावर शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरते. म्हणजेच समाजपरिवर्तनाची जबाबदारी शिक्षकाला पेलावी लागते.

Thank A Teacher - देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान... काव्य लेखन

७. संशोधक

संशोधन ही ज्ञानाची जननी आहे. विविध समस्यांचे निराकरण संशोधनाद्वारे करता येते. शिक्षणाच्या विविध स्तरावर कार्य करताना उदभवणाच्या समस्यांची उकल करण्यासाठी शिक्षक संशोधन कार्य हाती घेतात व शा पद्धतीने समस्यांचे समाधान करून घेतात. शिक्षकामधील संशोधनवृत्ती त्याला सर्जनशील कार्य करण्यास तसेच नवोपक्रम हाती घेण्यास प्रेरक ठरते. म्हणून शिक्षक कोणत्याही स्तरावर कार्य करणारा असो, त्याच्या ठिकाणी संशोधनवृत्ती असणे आवश्यक आहे.

८. उपचारात्मक अध्यापनकर्ता

अपेक्षित उद्दिष्टांपर्यंत मजल मारू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी केले जाणारे अध्यापन म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय. एकाच वर्गात एकाच वयोगटाचे विद्यार्थी सारख्याच पद्धतीने अध्ययन करतील असे नाही. काही विद्यार्थी अभ्यासात अग्रेसर असतात तर काही तुलनेने मागे पडतात. तुलनेने मागे पडणान्या विद्याथ्र्यांच्या अध्ययन मागासलेपणाचे निदान शिक्षकाला करावे लागते. यासाठी नैदानिक कसोट्या शिक्षकाच्या मदतीला येतात.

९. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कर्ता

२१ वे शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचे आहे. यासाठी प्रथमतः शिक्षक वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अधिकार करणारा असला पाहिजे. राष्ट्र निर्माण करण्याचे साधन शिक्षण असल्यामुळे विकासात अडसर ठरणाऱ्या अंधश्रद्धांना वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या विचारधारेतून पायबंद करता येतो व विज्ञाननिष्ठा व कर्मफलावर शिक्षकाचा ठाम विश्वास असेल तरच तो मुलांमध्ये वस्तूनिष्ठ विचारसरणी निर्माण करू शकेल, यादृष्टिने शिक्षकाची वैज्ञानिक दृष्टीकोनाची भूमिका महत्वपूर्ण बदल समाजात घडवून आणू शकेल.

१०. लोकशाहीचा पुरस्कर्ता

लोकांनी लोकांचे आणि लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. अशी अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. लोकशाहीमध्ये जात, धर्म, पंथ, वर्ण, गरीब श्रीमंत हा भेद केला जात नाही. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वांचा अंगिकार आपल्या देशाने केलेला आहे. लोकशाहीतील ही शाश्वत मूल्ये शिक्षणातून कोणत्याही स्तरावरील शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मनावर बिंवली पाहिजे. 

अशा विविध भूमिका बजावून प्रत्येक स्तरावरील शिक्षक प्रगल्भ राष्ट्र निर्माणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


आधुनिक काळामध्ये शिक्षकाची ही भूमिका बदलत चालली आहे. शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून काळानुसार शिक्षण प्रक्रियेत देखील बदल होत असतात. त्यानुसार आपल्यात देखील काळानुरूप बदल घडवून आणणे अपेक्षित असते. पारंपारिक शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती याचा विचार केल्यास सध्याच्या शिक्षण पद्धतीत खूप बदल घडून आलेले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आधुनिक शिक्षण पद्धती उदयास आलेली आहे  खडू-फळा ऐवजी फळ्याची जागा सध्या काही ठिकाणी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड ने घेतलेली आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. विविध अॅप्स ऑनलाइन शिक्षण यावर भर दिसत आहे. वास्तविक हे बदल परिस्थितीनुसार होत असून ते स्वीकारण्याची मानसिकता देखील शिक्षकांची असली पाहिजे. उदा. सध्याची परिस्थिती पाहता कोरोणा प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद आहेत. अशा वेळी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय उरत नाही. प्रत्येक शिक्षकाने आपली मानसिकता बदलून ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे, विद्यार्थ्यांशी कसे कनेक्टर राहावे, अॅप्स चा वापर कसा करावा, व्हिडिओ निर्मिती कशी करावी, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या व करूनही दाखवल्या. काही नवीन बदल स्वीकारले. शिकण्याची मानसिकता तयार करून प्रत्यक्ष अध्यापन ही सुरू केले. म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार नवीन बदल स्वीकारून शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवणे ही शिक्षकाची खरी कसोटी इथे दिसून येते.

नवीन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सुजाण व समृद्ध घडविण्यासाठी प्रत्येक शिक्षक हा जीव ओतून काम करत असतो. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे. शिक्षकांचा आदर केला पाहिजे. ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो त्या देशातील भावी पिढी ही सुजाण व सुसंस्कृत घडत असते हे सत्य आहे.

Post a Comment

0 Comments

close