माझा शिक्षक माझा प्रेरक निबंध लेखन मराठी. Thank A Teacher, Teachers Day #teachersday2021 शिक्षक कार्य गौरव सप्ताह 2021.
📚 देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान निबंध लेखन मराठी
📚 आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदलती भूमिका निबंध लेखन मराठी
📚शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध लेखन
गुलाबाप्रमाणे हसरे माझे शिक्षक
आकाशाप्रमाणे विशाल माझे शिक्षक
निराधाला आधार माझे शिक्षक
समाजाला प्रेरक माझे शिक्षक
मला आठवते, मी ज्या दिवशी शाळेत प्रवेश घेतला त्यादिवशी माझ्या सरांनी माझे सुंदर गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. माझ्या डोळ्यातून नकळतपणे ओघळणारे अभु त्यांनी पुसले. त्यांनी मला पहिल्याच दिवशी शाळेची इतकी गोडी लावली की दुसऱ्या दिवशी मला शाळेत केव्हा एकदाची जाते असे झाले.
Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓
आमच्या सरांचे कौतुक किती करावे तितके कमीच आहे. त्यांचे अक्षर मोल्याप्रमाणे सुरेख आहे. त्यांचे बोलणे-वागणे सर्वांना आपलेसे करणारे आहे. त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खुप चांगले वळण लावले. सर शाळेत दररोज आमच्या अगोदर हजर असतात. शाळेच्या स्वच्छतेपासुन ने शाळेची गुणवत्ता वाढेपर्यंत ते झटुन कार्य करतात. सर आम्हाला प्रत्येक विषयातील घटक कृतीतुन शिकवतात.
त्यामुळे आम्हाला दिवसभर खुप उत्साही वाटते. आमचे सर आम्हाला खेळ, गायन, नृत्य, वादन, भाषण, लेखण, चित्रकला इ. सर्व उपक्रमांत नेहमी सहभाग घ्यायला लावतात. आमच्या सरांमुळे मी आज धाडसाने सर्व गोष्टी करू शकते आमच्या सरांना मी देवसमान मानते. मला त्यांच्या शिवाय अजिबात करमत नाही.
Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट दुसरा इ. 6वी ते इ. 8वी
सध्या कोरोना महामारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून माझी शाळा बंद आहे. खरे तर सुट्टीच्या दिवशीही भरणारी, जास्त तास घेणारी माझी शाळा आज बंद आहे. हे लिहिताना मला खुप वाईट वाटते. पण तरीही ऑनलाईन माझी शाळा सुरु आहे. माझी शाळा खेडेगावात असल्यामुळे सर्व मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्याशी सरांनी संपर्क साधुन ऑनलाईन 'गुगल मीट' या अँपद्वारे शिकवण्याचे काम सुरु केले आहे. सरांनी पूर्वीपासुन आमचा व्हॉटसअॅप ग्रुपही केला आहे. ज्या मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यांना प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकामधील घटकांचे अधिक विश्लेषण करणारे प्रश्न काढून त्यांच्या झेरॉक्स वाटल्या आहेत. आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष मुलांच्या घरी योग्य ते खबरदारी घेऊन ते जातात आमचे सर स्वतः युटयुबच्या माध्यमातुनही आम्हाला शिकवतात. आमच्या शाळेतील विदयार्थ्यांना फोनवरून दररोज ते कॉलही करतात. प्रत्येक विदयार्थ्यांचा फोन उचलुन ते योग्य मार्गदर्शन करतात.
आमच्या गावातही सरांनी कोरोना विषयी सर्व गावकऱ्यांना अनेकदा मार्गदर्शन केले आहे. स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. मी स्वतःला भाग्यवान समजते. कारण मला आमच्या सरांसारखे आदर्श, मनमिळाऊ, प्रेमळ, शिस्तप्रिय शिक्षक मिळाले.
सर,
आम्हाला तुमचा सहवास हवा...
तेव्हाच दिवस वाटेल प्रत्येक नवा...
0 Comments