Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माझे आवडते शिक्षक निबंध / भाषण / कविता

माझे आवडते शिक्षक निबंध / भाषण / कविता लेखन मराठी. Thank A Teacher Teachers Day #teachersday2021 शिक्षक कार्य गौरव सप्ताह 2021.

वक्तृत्व - माझे आवडते शिक्षक भाषण


सृष्टी आदित्य धस, 
इ. 3री, जि. प. शाळा लांजा नं. ५



मराठी निबंध - माझे आवडते शिक्षक 

गुरुर्ब्रहमा गुरुर्विष्णु: 
गुरुदेवो महेश्वरः । 
गुरु: साक्षात् परं ब्रह्म 
तस्मै श्री गुरवे नमः ॥

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देवून त्यापासून सुंदर मडके घडवतात, त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला सुरेख आकार देण्याचे महान कार्य शिक्षक करतात. आई ही प्रत्येकाचा पहिला गुरु असते. त्यानंतर प्रत्येकाला घडवण्या चे महान करतात कार्य शिक्षक करतात. मला माझ्या आईवडिलाप्रमाणेच घडवण्याचे कार्य माझ्या गुरुनी केले. त्यातील मला सर्वात जास्त भावलेले व्यक्तीमत्व म्हणजे माझे अमित जाधव सर. 


प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा पाया म्हणजे त्याचे प्राथमिक शिक्षण. मला पहिलीत असताना माझ्या वडिलाप्रमाणे सरांनी माझ्यावर प्रेम केले. माझे सर मी शाळेत जाण्या अगोदरच शाळेत आलेले असत. त्यांना स्वच्छतेची फार आवड होती. त्यांनी आमच्या शाळेत अनेक औषधी वनस्पती सुंदर फुलझाडे लावली. ते एक उत्तम कलाकार होते. कोणतीही कविता ते कृतीसह शिकवत. मी आजही त्या कविता गुणगुणते. पुस्तकातील कोणताही धडा इतक्या तन्मयतेने ते शिकवित की आमचा तो धडा तोंडपाठ होत असे. घरी जाऊन पुन्हा पुस्तक वाचण्याची गरज कधीच पडायची नाही. त्यांचे हस्ताक्षर मोत्या प्रमाणे सुंदर असल्यामुळे माझे हस्ताक्षरही आपोआप सुंदर बनले. त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. त्यांनी आमचा प्रत्येक विषय पक्का केला. आमचा सरांच्यासोबत आमचा दिवस कसा जाई, ते कळतच नसे. मला सरांनी भाषणाची, गायनाची, आवड लावली. 

गणित व शारीरिक शिक्षण हे त्यांचे आवडते विषय. अवघड वाटणारा गणित विषय सर आम्हांला खूप सोप्या भाषेत शिकवत. कृतीतून समजावून सांगत. त्यामुळे इयत्ता पहिलीपासून च आमची गणिताची भिती पळून गेली. आमच्या सरांना खेळाची आवड असल्यामुळे ते आम्हाला दररोजचा संध्याकाळी मैदानावर खेळायला घेऊन जात. अगदी पहिली पासून खो-खो, कबड्डी, लंगडी, हे सांघिक खेळ शिकविले. मनोरंजनात्मक खेळांचा तर त्यांच्याकडे खूपच संग्रह होता. दररोज एक नवीन खेळ घेत. 

आमच्या शाळेत सरांनी मोबाईलवर नवनवीन अँप स्वतः तयार करून आम्हाला तंत्रज्ञानात सक्षम बनवले. कोविड 19 च्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी आमच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. Google meet, Teachmint द्वारे  आम्हाला छान मार्गदर्शन केले. Google meet, teachmint, you tube कसे वापरावे? विविध apps डाउनलोड करुन त्यांचा वापर कसा करावा? याविषयी सुंदर माहिती दिली. त्यांनी इ-लर्निंगद्वारे आमची शिक्षणाची गोडी अधिक वाढवली. माणूस म्हणून घडवण्याचे महान कार्य सरांनी केले.

अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी आर्थिक, भावनिक मदत केली. त्यांनी आमच्या पालकांनाही वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले. कोणतीही अपेक्षा न करता ते मनापासून ज्ञान दानाचे पवित्र कार्य करीत. आजही सरांचे कार्य आठवले की मन थक्क होते. वाटते इतकी कार्यक्षमता आली कोठून? त्यांनी मला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही तर माझ्या आयुष्याला आकार देण्याचे मोलाचे कार्य केले. अश्या अमित जाधव सरांसारख्या शिक्षकाची आज समाजाला नितांत गरज आहे. अशा प्रेमळ, कर्तव्यदक्ष, अष्टपैलू सरांना मी कधीच विसरणार नाही.

Post a Comment

0 Comments

close