Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध लेखन

शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध लेखन मराठी. Thank A Teacher Teachers Day #teachersday2021 शिक्षक कार्य गौरव सप्ताह 2021.

गुरुविण न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान ||

जीवन भवसागर तराया,

चला वंदू गुरुराया ||

शिक्षक या तीन अक्षरांमध्ये खूप मोठा अर्थ सामावला आहे. शिक्षक म्हणजे शिकवणारी व्यक्ती नव्हे तर शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती जी प्रत्येक विद्यार्थाच्या जीवनाला आकार देते, प्रत्येक विद्यार्थ्याला संस्कारक्षम करणारी आणि येणाऱ्या भावी पिढीला योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती होय. शिक्षक हे खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. कारण शिक्षकांच्या हातातच हजारो पिढ्या घडवण्याचे सामर्थ्य आहे. शिक्षक देखील आपले कर्तव्य चोख बजावतात देशाची भावी पिढी ही केवळ आणि केवळ एका शिक्षकाच्या योगदानावरच घडत असते. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर प्रत्येक शिक्षक आपली स्वतःची जबाबदारी म्हणून आपल्या प्रत्येक विदयार्थांच्या सर्वागीण विकासासाठी आयुष्यभर झटत असतात.

शब्दांनी ज्ञान वाढवणारा, 

जगण्यातून जीवन घडवणारा, 

मूल्यांतून तत्वे शिकवणारा, 

समाजाला योग्य दिशा दाखवणारा, 

तो म्हणजे शिक्षक !!

शिक्षणाशिवाय कोणत्याच देशाची किंवा कोणत्याच व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही आणि शिक्षकाशिवाय तर ती अशक्य आहे. शिक्षक हे समाज परिवर्तनाचे व देशाच्या जडणघडणीचे महत्त्वाचे माध्यम आहे.

रविंद्रनाथ टागोर नेहमी म्हणायचे की.... "शिक्षक आपल्याला उचित व अनुचित यातील भेद ओळखायला शिकवतात.” शिक्षक हे केवळ ज्ञान देणे नव्हे.... तर शिक्षणाच्या माध्यमातून देशासाठी उत्तम नागरिक घडवण्याची प्रक्रिया सतत चालू असते. शिक्षणाच्या प्रक्रियेत म्हणूनच समाजपरिवर्तनाची, समाजासाठी उत्तम चारित्र्य करण्याची जबाबदारी अर्थातच शेवटी शिक्षकावरच आहे. शिक्षक हे समाज परिवर्तनाचे अत्यंत महत्वाचे माध्यम आहे.

नेहमी ज्ञानाची तहान असले तो शिक्षक, 

नेहमी विद्यार्थ्याची प्रगती पाहतो तो शिक्षक !! 

नेहमी ज्ञान अंजनाने प्रगलम करतो तो शिक्षक, 

नेहमीच घडतो व घडवतो तो शिक्षक !!

ज्याप्रमाने शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला घडवितात. त्यांच्या जीवनाला आकार देतात त्यांना संस्कारक्षम बनवितात. त्यावरच पुढील काळातील समाजाची नीतीमुळे, आचार-विचार, व्यवहार, माणूसकी या सर्व गोष्टी अवलंबून असतात, त्यामुळे खरोखरच शिक्षकांमुळेच समाज परिवर्तन घडून येते. या काहीही शंका नाही.

पूर्वीच्या काळी देखील गुरुला देवता मानले जात. त्या काळात देखील गुरू हेच योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य करित होते. गुरूंची महती कधीच कमी होऊ शकत नाही.

निसर्गाला रंग हवा असतो,

फुलाला सुगंध असावा लागतो ।

तसेच शिक्षण घेताना, 

एक चांगला गुरु असावा लागतो |


शिक्षक आपल्याला शिस्तीचा धडा देतात. याशिवाय वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दलदेखील ते आपल्याला मार्गदर्शन करतात. विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्व फार आहे. चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळेचा सदुपयोग करता येतो. शिक्षक विद्यार्थ्यांत नेतृत्वाचे गुण विकसित करतात. शिक्षक कधीही साधारण नसतो, एका शिक्षकांच्या हातात प्रलय आणि निर्माण दोन्ही असतात. शिक्षक आपल्याला चांगल्या व वाईट गोष्टींमधील फरक सांगतात, शिष्टाचार, धैर्य, सहनशीलता इत्यादी गुणांनी जीवन जगायला शिकवतात. विदयार्थ्यांचे संपूर्ण भविष्य शिक्षकाच्या हाती असते.

" गुरुब्रम्हा गुरुर्विष्णुः

गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरु: साक्षात् परब्रम्ह

तस्मै श्री गुरवे नमः ॥"


Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓

संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांनाच तोंडपाठ असेल. या श्लोकात गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायली आहे. प्रत्येक विदयार्थ्यांच्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण असते. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरुचा सहवास लाभला नाही, त्याचे जीवन अंधकारमय असते शिक्षक आपल्या मदतीने व्यक्ती समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्या शिक्षणा मुळेच विद्यार्थात आत्मविश्वास वाढतो. आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते.

शिक्षक हा मेणबत्तीसारखा ज्ञानाचा प्रकाश आहे. जो लोकांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे घेऊन जातो. शिक्षक हा एका सुंदर आरशासारखा आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपले अस्तित्व ओळखू शकते. विद्यार्थी हा शिक्षकांच्या हातातील ओल्या मातीसारखा असतो, ज्याला ते कोणताही आकार देऊ शकतात. खरोखरच शिक्षकांमुळे विद्यार्थी घडू शकतात. शिक्षक हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे माध्यम आहे.

शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा अन पवित्र्याचा, 

एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला ॥ 

शिक्षक अपूर्णला पूर्ण करणारा, 

शिक्षक निर्माता भावी पिढीचा अन समाजाचा !!

Post a Comment

0 Comments

close