भारत निवडणूक आयोग पुरस्कृत "मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता निवडणूक साक्षरता मंच ( Electoral Literacy Club) स्थापन करण्याबाबत नुकताच शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची कार्यपद्धती
३.१ प्रत्येक शाळा आणि प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्याचा एक निवडणूक साक्षरता मंच स्थापन करावा. या मंचाचे इयत्ता ९ वी ते १२ वीचे सर्व विद्यार्थी सभासद असतील.
३.२ प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधींची निवड करण्यात यावी. प्रत्येक वर्गातील निवडलेले प्रतिनिधी व या विद्यार्थ्यांमधून निवडलेली कार्यकारी समिती ही या मंचचे कामकाज पाहील.
३.३ निवडलेले विद्यार्थी प्रतिनिधी त्यांच्यामधून मंचाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करतील.
३.४ निवडणूक साक्षरता मंचासाठी नोडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निवडणुकीच्या कार्याचा अनुभव असलेल्या एका शिक्षकाची नेमणूक करावी,
३.५ निवडलेल्या सदस्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या निवडून आलेले प्रतिनिधी मंचाच्या कामकाजासाठी जबाबदार असतील. या प्रतिनिधींना नोडल अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अभिप्राय मिळेल व ते नोडल अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली असतील.
३.६ नोडल अधिकाऱ्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या :
शाळेच्या मानवता विभागातील एक किंवा दोन शिक्षक निवडणूक साक्षरता मंचाचे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. ते संबंधित निवडणूक साक्षरता मंचाचे मार्गदर्शक म्हणून देखील कामकाज पाहतील. निवडणूक कर्तव्य अनुभव असलेल्या शिक्षकांना या कामासाठी प्राधान्य दिले जावे त्यांच्या कामकाजाचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे अरोल : शालेय शिक्षण
1. निवडणूक साक्षरता प्रतिबध्दता संसाधनांसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याव्दारे विहित केलेल्या कार्यपध्दतीशी समन्वय साधणे विद्यार्थी व शिक्षकांसाठीची प्रतिबध्दता संसाधने जिल्हा निवडणूक अधिकान्यातर्फे ऑनलाईन, ऑफलाईन किंवा इतर माध्यमातून पुरविली जातीलs,
॥ निवडणूक साक्षरता मंचातील विशिष्ट साधने संसाधनांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे.
III. निवडणूक साक्षरता मंचातील उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.
IV. भावी मतदारांची कौशल्ये अनुभवातून विकसित करण्यासाठी निवडणूक साक्षरता प्रक्रियेतील संसाधनांचा वापर प्रक्रियेचे आयोजन करणे.
V. निवडणूक साक्षरता मंचाच्या उपक्रमाव्दारे शाळेतील मुलांना निवडणुकांसाठी मार्गदर्शन करणे.
VI. नवीन संसाधने निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे व ते जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अग्रेषित करणे.
VII. विद्यार्थी कार्यकारी समिती यांच्याशी सल्लामसलत करून वर्षासाठीच्या उपक्रमांची वार्षिक
VIII. दिनदर्शिका विकसित करणे.
IX. इयत्ता १२ वी पात्र विद्यार्थ्यासाठी नावनोंदणीसाठी सोय उपलब्ध करणे, नोडल अधिकारी यांना मंचाच्या कार्यकारी समिती सदस्यांना मंचाचे काम सांगण्याचा अधिकार असेल.
निवडणूक साक्षरता मंच स्थापन करणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here
३.७ प्रत्येक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाने दि. २१ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत त्यांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना करावी.ss तसेच दि. २६ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत निवडणूक साक्षरता मंचाचा नोडल अधिकारी असणाऱ्या शिक्षकांचे आणि विद्यार्थी प्रमुखांचे संपर्क क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक आणि मेल आयडी) मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाला आणि परिशिष्ट क्र. १ मध्ये देण्यात आलेल्या संबंधित जिल्हा कार्यालयाच्या मेल आयडीवर कळविण्यात यावेत.ss
३.८ नोडल अधिकारी यांनी निवडणूक साक्षरता मंचामध्ये समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निवडणूक साक्षरता मंचासाठी व्हॉट्सजेंपवर किंवा टेलिग्रामवर एक स्वतंत्र गट तयार करावा.
३.९ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आयोजित करित असलेल्या विविध ऑनलाइन, ऑफलाइन स्पर्धाची माहिती नोडल अधिकाऱ्यांनी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निवडणूक साक्षरता मंचाच्या व्हॉट्सअॅप इतर माध्यमांच्या गटावर पाठवून विद्यार्थ्यांना सदर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे.
३.१० मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आयोजित करित असलेल्या वेबसंवाद, परिसंवाद यांची माहिती शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंचाच्या गटावर पाठवून ते ऐकण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.
३.११ निवडणूक साक्षरता मंचासंदर्भात जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी हे संपर्क/ समन्वय अधिकारी असतील. निवडणूक साक्षरता मंचांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रम / कार्यक्रम/विविध स्पर्धा याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. ३.१२ सदर उपक्रमांसाठी शक्य तेथे राष्ट्रीय सेवा योजना एन.सी.सी. व स्काऊट आणि गाईड प्रशासनाचे आवश्यक सहकार्य घेण्यात यावे.
३.१३ निवडणूक साक्षरता मंचासाठी सर्वसाधारण उपक्रम :
I परस्परसंवादी शाळा सहभाग कार्यक्रम, ss
II जागतिक मतदार दिनादिवशी निवडणूक साक्षरता सप्ताहांचे आयोजन.
III. निवडणूक शिक्षणाशी संबंधित वादविवाद.
IV. भित्तिपत्रके, बातमी मासिके ss
V. निबंध स्पर्धा, कथा लेखन स्पर्धा
VI.निवडणूक साक्षरता कार्यक्रमांसाठी जवळपासच्या समुदायांशी संलग्न होणे..
0 Comments