Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माझे आवडते शिक्षक कविता - शिक्षक म्हणजे? कवी - योगेश हरीभाऊ होनाळे

माझे आवडते शिक्षक कविता लेखन मराठी. स्वरचित कविता, काव्यवाचन, काव्यगायन. Thank A Teacher Teachers Day #teachersday2021 शिक्षक कार्य गौरव सप्ताह 2021.कविता - 'शिक्षक म्हणजे '


शिक्षक म्हणजे,

आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा, 

ध्येयापूर्तीसाठी मार्ग दाखविणारी दिशा, 

कधी बिकट परिस्थितीत, प्रेमाची साथ, 

तर कधी पाठीवरील शाबासकीचा हात, 

कधी कौतूकाचे गोड शब्द 

तर कधी हातावर बेसणारा छडीचा मार.


शिक्षक म्हणजे, 

चांगले संस्कार करणारी मूर्ती, 

संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती, 

चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार, 

जादूची छडी जी करते विद्यार्थ्याची स्वप्ने साकार.


शिक्षक म्हणजे, 

सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार, 

दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार, 

अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी तलवार, 

अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार, 

असे हे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार


कवी - योगेश हरीभाऊ होनाळे, 
रा. मलकापूर, जि. बुलडाणा, 
संपर्क-९७६६७८२३९४


Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓

Post a Comment

0 Comments

close