Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर... शुभम कुमार देशात पहिला तर महाराष्ट्रात मृणाली जोशी प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा २०२० या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शुभम कुमार हा देशात पहिला तर मृणाली जोशी ही महाराष्ट्रात प्रथम आली आहे. 

देशातून पहिला क्रमांक मिळविलेल्या शुभम कुमारचे शिक्षण आयआयटी मुंबई येथे झाले आहे. तो मूळचा बिहार मधील आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

महाराष्ट्रातील पुण्याची मृणाली जोशी देशात ३६वी आली असून अहमदनगरचा विनायक नरवडे देशात ३७वा आला आहे. ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.

पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम हिने देखील उत्तुंग यश मिळवले आहे. पूजा युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिने यात ५७७ वी रँक मिळवली आहे.

देशातील एकमेव उदाहरण - फक्त 2 खोल्या असलेल्या घरातील सख्खे चारही भाऊ-बहिण क्लास 1 अधिकारी IAS & IPS 

ऑटो चालकाचा मुलगा ते वयाच्या 21 व्या वर्षी IAS 

अन्सार शेख IAS कसा झाला? त्याच्याच शब्दात पहा. संपूर्ण प्रवास  पाहण्यासाठी येथे टच करा.

यंदाच्या निकालात मुलींची संख्या वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अंतिम यादीत ५४५ पुरुष तर २१६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर पहिल्या २५ मध्ये १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. याचबरोबर २५ उमेदवार हे दिव्यांग्य प्रवर्गातील आहेत.

यंदा या परीक्षेला सुमारे १० लाख ४० हजार ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १० हजार ५६४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यातून दोन हजार ५३ विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम ७६१ जणांची यादी जाहीर करण्यात आली.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अखेरच्या दिवसांत कसा कराल?  Useful Tips - Click Here

UPSC 2020 निकाल दृष्टीक्षेपात

परीक्षा दिलेले उमेदवार ४८२७७० 

मुख्य परीक्षेसाठी पात्र - १०५६४ 

मुलाखतीसाठी पात्र - २०५३ 

निवड झालेले उमेदवार ७६१

महाराष्ट्रातील निवड झालेले - 100

महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आलेल्या मृणाली जोशी विषयी जाणून घ्या. Click here

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा संपूर्ण निकाल पाहण्यासाठी लिंक

https://www.upsc.gov.in

प्रथम 1 ते 50 उमेदवारांची निवड यादी

संपूर्ण 761 उमेदवारांची निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click here. 

Post a Comment

0 Comments

close