केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा २०२० या परीक्षेमध्ये पुण्याच्या मृणाली जोशी हिने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक तर देशात तिचा 36 वा क्रमांक आलेला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा २०२० या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शुभम कुमार हा देशात पहिला तर मृणाली जोशी ही महाराष्ट्रात प्रथम आली आहे.
IAS परीक्षेत मुलाखती साठी विचारले जाणारे प्रश्न
UPSC result 2021 topper list PDF - Click here
निकालानंतर मृणाली जोशी काय म्हणाली?
मृणाली जोशी म्हणाली की, केंद्रीय सेवेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तसे माझे देखील होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले असून आता मला महिलांसाठी काम करायला निश्चित आवडेल.
मृणाली जोशी हिचा IAS पर्यंत चा प्रवास
मृणाली हिचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अभिनव इंग्लिश मीडियम शाळेमध्ये झालं. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अकरावी आणि बारावी सायन्समध्ये केले.
बारावीनंतर इंजिनियरिंग अथवा इतर कोर्सेस न करता UPSC परीक्षा देण्यासाठी तिने बीए इकॉनॉमिक्समधून पदवी पर्यंतच शिक्षण घेतलं. तिथे देखील चांगले गुण मिळवले. केंद्रीय सेवेत जाण्याचे बीएच्या पहिल्याच वर्षी निश्चित केले होते.
त्यानुसार तिने तयारी करण्यास सुरुवात केली. याबाबत आई-बाबांनी तिला प्रोत्साहन दिलं. पहिल्या प्रयत्नामध्ये तिला यश मिळाले नाही. मात्र दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. पहिल्या प्रयत्नात अपयश का आले, त्याची कारणे शोधून त्यावर तिने काम केले. तिने दररोज ८ तास अभ्यास आणि इतर वाचन करण्यावर भर दिला.
अभ्यास करत असताना सोशल मीडियापासून ती कायम दूरच राहत असे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मृणाली चा संदेश
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीवर्गाची संख्या मोठी आहे. या परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास ते विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलायच्या घटना घडल्या आहेत. या घटना लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून जाऊ नये. त्यांनी पुढील परीक्षेची निश्चित तयारी करावी. पण टोकाचे पाउल उचलू नये. यश मिळवण्यासाठी हे एकच क्षेत्र नाही. इतर क्षेत्रात देखील आपण यशस्वी होऊ शकतो, असा सल्ला मृणाली जोशी हिने दिला.
0 Comments