Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा

Digital reading competition on the occasion of Reading Inspiration Day डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. 

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


डिजिटल अभिवाचन स्पर्धेचे नियम आणि अटी

मराठी साहित्यातील कोणत्याही ललित लेखाचं (कोणत्याही उताऱ्याचं) अभिवाचन स्पर्धक करू शकतात. लेख स्वलिखित किंवा प्रथितयश लेखकांचा असेल तरीही चालेल. ब्लॉग लेखनही चालेल. ललित लेखाचा विषय कुठलाही चालेल. विषयाचं बंधन नाही.


शालेय शिक्षण whatsApp Group ला join व्हा. 

व्हिडीओची वेळ – 

व्हिडिओ ३ ते ५ मिनिटांचा असावा. (५ मिनिटांच्या वर नसावा).

स्पर्धकांनी व्हिडीओ abhivachan.miti@gmail.com या इमेल वर गुगल ड्राईव्ह वरून पाठवावा. ड्राईव्हवरून व्हिडीओ जात नसल्यास wetransfer.com किंवा transferxl.com या साईट्सवरून व्हिडीओ पाठवू शकता.

डिजिटल अभिवाचन स्पर्धेचा विषय – 

डिजिटल अभिवाचन स्पर्धेसाठी मराठी साहित्यातील ललित लेखन अंतर्गत उतारा वाचन असा आहे. 

डिजिटल अभिवाचन स्पर्धेचे गट

डिजिटल अभिवाचन ही स्पर्धा ३ गटात होईल.

गट क्र. १ : वयोगट ५ ते १५

गट क्र. २ : वयोगट १५ ते ३०

गट  क्र. ३ : वयोगट ३० वर्ष 


स्पर्धकांना महत्त्वाच्या सूचना

व्हिडीओ पाठवताना संपूर्ण नाव,ठिकाण, फोन नंबर आणि स्पर्धेचा गट ही सर्व माहिती मेलमध्ये नमूद करावी.

(स्पर्धकांनी या माहितीशिवाय मेल पाठवले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत)


डिजिटल अभिवाचन स्पर्धेसाठी व्हिडिओ कसा तयार करावा? 

व्हिडीओ करताना फोन आडवा धरावा. 

मागील बाजू प्लेन असावी किंवा एका रंगातील असावी. 

अभिवाचन सुरु करण्याआधी आपले नाव सांगावे. 

तुम्ही जे अभिवाचन करणार आहात त्या कलाकृतीचेही नाव सांगावे.


व्हिडीओ कोठे पाठवावा? 

डिजिटल अभिवाचन स्पर्धेचा व्हिडिओ abhivachan.miti@gmail.com या ईमेल वर पाठवावा. ड्राईव्हवरून व्हिडीओ जात नसल्यास wetransfer.com किंवा transferxl.com या साईट्सवरून व्हिडीओ पाठवू शकता.

डिजिटल अभिवाचन स्पर्धेच्या बक्षिसांचे स्वरूप 

रोख रक्कम,प्रशस्ती पत्रक आणि पुस्तकं असे असेल.

विजेत्या स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ कार्यक्रमात वापरले जातील आणि इतर काही निवडक स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर,मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर, तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील.

अधिक माहितीसाठी  9930115759 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments

close