जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १3 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात येत आहे. यापुर्वी ही मुदत 29 जुलै पर्यंत होती.
JNVST 2025 अर्ज मुदतवाढ - 13 ऑगस्ट 2025 पर्यंत JNVST 2026 Application date extended
अर्ज करण्याची मुदतवाढ ही फक्त इ. 6वी च्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी देण्यात आलेली आहे. इ. 6वी च्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अंतिम मुदत 13 ऑगस्ट पर्यंत असेल.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 इ. 6वी / इ. 9वी साठी ही परीक्षा संपूर्णतः मोफत असते. जर नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्यास पुढील सर्व शिक्षण मोफत होते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावे.
जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2026 साठी आवेदनपत्र कसे भरावे? आवेदनपत्र भरताना कोणती व कशाप्रकारची माहिती लागते हे आपणाला फाॅर्म भरण्यापूर्वी माहिती असणे आवश्यक आहे.
नवोदय परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक - Click Here
येथे टच करा.
तरी ज्यांची आवेदनपत्रे भरायची राहिली असतील त्यांनी वरील मुदतीत भरुन घ्यावीत. ही परीक्षा निशुल्क असते, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतील यासाठी प्रयत्न करा.
जवाहर नवोदय विद्यालय संक्षिप्त माहिती
5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते
प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते
ग्रामीण भागातील विद्यार्थी 80% व शहरी भागातील 20% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
SC / ST/OBC / OPEN आरक्षण आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते.
Tags - javahar navodaya vidyalaya selection test, navodaya Exam, navoday, navoday selection test, नवोदय, नवोदय परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा इयत्ता ६ वी, जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा इयत्ता ६ वी,
0 Comments