Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Maha Student app द्वारे विद्यार्थांचे निकालपत्रक तयार होणार. Maha Student App डाउनलोड करा.

Maha Student app द्वारे विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी नोंदवली जाणार. Maha Student app द्वारे विद्यार्थांचे निकालपत्रक तयार होणार. Maha Student App डाउनलोड करा. तसेच मध्यान्ह भोजन योजनेची (MDM) माहिती नोंदवण्यासाठी सुद्धा याच हजेरीचा उपयोग करण्यात येणार आहे. 

शिक्षण विभागामार्फत MahaStudent हे ॲप विकसित करण्यात आले आहे. सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदविता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. MahaStudent ॲप मुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळे ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही.

विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी ची सुविधा Maha Student app वर देण्यात आलेली आहे. या ॲप वरुन सर्व विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित चे गुण भरता येणार आहेत. 



Maha Student app संदर्भातील शासन परिपत्रक डाउनलोड करा. 

तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणाली यशस्वी होण्यास मदत झाली आहे. सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने भरण्यात आली आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणून mahaStudent हे ॲप विकसित करण्यात आले आहे. 

Maha Student app डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. - Click Here. 

Maha Student ॲप चे फायदे? 


1) भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. 

2) यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत. 

3) राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

4) या ॲपच्या वापरामुळे MDM मध्यान्ह भोजन योजनेची माहिती भरण्याचा त्रास वाचणार आहे. 

5) Maha Student ॲप मुळे ऑफलाईन हजेरीपत्रक ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. 

6) संकलित व आकारिक मूल्यमापनाचे गुण भरता येणार. 

7) विद्यार्थ्यांचा निकाल आपोआप तयार होणार. 


Maha Student ॲप  वापरातील समस्या

1) बऱ्याच ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असल्याने दररोजची माहिती अपडेट करण्यास अडथळा निर्माण होईल. 

2) सतत ऑनलाईन कामे वाढत असल्याने शिक्षकांवरील ताण वाढणार आहे. 

3) एखादे दिवशी माहिती भरायची राहिल्यास शिक्षक त्याच विचारात राहून अध्यापनातील लक्ष विचलित होवू शकते. 

Post a Comment

0 Comments

close