कविता - शिक्षकांशी प्रेमाने वागा
November 21, 2021
कविता - शिक्षकांशी प्रेमाने वागा
शिक्षक आहे आजही
आपल्या राष्ट्राचा कणा
बोलतांना त्यांच्याशी जरा
तुम्ही सौम्य बना.
बोलू नका उठसुठ
त्यांच्या पगाराबद्दल
व्याज खात नाही तो
खातो फक्त मुद्दल.
सांगा शिक्षकाची आहे का
दोन नंबरची वाट
बोलतांना त्यांच्याशी
भाषा वापरू नका ताठ
वीस पंचवीस वर्षे
बिचारा पुस्तकात घालतो
थोडा पगार त्याचा अधिक
तरी का डोळ्यात सलतो
जगू द्या त्यालाही
आता सुटबुटात
इमानदारीने अन्न असते
केवळ त्याच्यां ताटात
शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आज
झाले सारी अधिकारी
सांगा मग त्यांची कमाई
आहे का हो भारी
दोन पैसा जास्त घेऊन
जर उंचावेल त्यांचे जीवनमान
यातुन बघा मग
होतील डॉक्टर वकील
अजून खूप महान.
शिक्षकांशी आदराने वागून
सोडा भाषा अरेरावी
लक्षात असू द्या
तोच घडवितो ही पिढी भावी
0 Comments