Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निष्ठा प्रशिक्षण 3.0 इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण

इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत दीक्षा ॲप या प्लॅटफॉर्म वर आयोजित करण्यात येणार आहे. 



सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील सर्व शासकीय व अनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA Training ३.० FLN (National Initiative For School Heads and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे.

निष्ठा प्रशिक्षण 3.0 - Click Here

Join WhatsApp Group


निष्ठा प्रशिक्षण 3.0 मोड्यूल्स/विषय

१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.

२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल. 

३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते?

४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग

५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन ६. पायाभूत भाषा आणि साक्षरता.

७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण

८. अध्ययन मुल्यांकनमुल्यांकन

९. पायाभूत संख्याज्ञान

१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर

११. शालेय शिक्षणातील पुढाकार

१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

वरीलप्रमाणे सामान्य अभ्यासक्रमावर आधारित 12 मोड्यूल्स चा प्रशिक्षणामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहेत. 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 शासन परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

निष्ठा प्रशिक्षण 3.0 नोंदणी / Registration कसे करावे? 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 प्रशिक्षण वेळापत्रक


निष्ठा प्रशिक्षण 3.0 हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्म वर होणार असल्याने यासाठी आवश्यक सुचना खालीलप्रमाणे.

१) सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व शिक्षकांनी DIKSHA अॅपवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
२) DIKSHA अॅपवर नोंदणी करणेसाठी https://youtu.be/LFmHsU-nk_E या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहू शकता. 
३) सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक ३० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमवार आधारित ४ व दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून सदरचे सर्व १२ कोर्सेस (मोड्यूल्स) पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 
४) शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे. 
५) सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA अॅपवर दर ३० दिवसांसाठी एकूण ४ मोड्यूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे.
६) शिक्षक आपल्या पसंतीनुसार एका वेळी एक किंवा एका पेक्षा जास्त मोड्यूल्स चे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. 
७) उपलब्ध करून देण्यात आलेले मोड्यूल्स हे विहित मुदतीमध्ये शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक आहेत. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात येत आहे. 
८) ऑनलाईन नोंदणी व लॉगीन तसेच इतर शंका दूर करण्यासाठी आवश्यक सर्व व्हिडीओ देखील पत्रासोबत देण्यात आलेले आहे. तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठीची ऑनलाईन नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच दिनांक ०१ जानेवारी, २०२२ पासून सदरच्या प्रशिक्षणास सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरुवात होत आहे.
९) सदर प्रशिक्षणासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असून ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्षामधील निष्ठा प्रशिक्षण तसेच ऑनलाईन स्वरुपामधील प्रशिक्षण यामध्ये काम केले आहे. अशा प्रती जिल्हा २ SRP यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती संदर्भ क्रमांक ३ नुसार करण्यात आलेली आहे.
१०) तसेच कार्यरत आय.टी. विषय सहायक यांना तांत्रिक कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. याकरिता आवश्यक सविस्तर उद्बोधन आयोजित करण्यात येईल.
११) याचबरोबर सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मुल्यांकनामध्ये किमान ७०% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे, याची नोंद घ्यावी. 
१२) तसेच वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला कोर्सेस (मोड्यूल्स) ला सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जॉईन करून ठेवणे गरजेचे आहे. विहित ३० दिवसांच्या मुदतीच्या ५ दिवस पूर्वीस प्रशिक्षणार्थी कोर्स (मोड्यूल) जॉईन करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.

तरी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA अॅपच्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावे यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होईल.


Post a Comment

3 Comments

  1. 1 january 2021 se honewali 1 to 5 class ki trainnig ka registration karna hai

    ReplyDelete
  2. Where is link of Module 5, 6, 7, 8

    ReplyDelete

close