माध्यमिक शाळेतून उच्च माध्यमिक शाळेतील बदलीस मान्यता देण्याबाबत शासन परिपत्रक पहा.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१ (५) अन्वये माध्यमिक शाळेतून कनिष्ठ अध्यापक महाविद्यालयात किंवा उलट अशा प्रकारे शिक्षकांच्या बदलीबाबत तरतुद आहे. तथापि, सदर नियमात माध्यमिक शाळेतून उच्च माध्यमिक शाळेतील किंवा उलट, अशा प्रकारे शिक्षकांच्या बदलीबाबत स्पष्ट तरतूद नाही.
शासन निर्णय दिनांक २२.२.२०१९ नुसार अध्यापक विद्यालयातील पदव्युत्तर पदवी व बी. एड. अर्हता धारक शिक्षक तसेच उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी व बी. एड. अर्हताधारक शिक्षकांचा समावेश S-१६ या गटात होतो व वेतनश्रेणी रु. ४४९००-१४२४००/- अशी आहे.
श्रेणीनुसार शाळांची चढती मांडणी ही प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक/ अध्यापक महाविद्यालय अशी आहे. प्राथमिक वरून माध्यमिक शाळेत, आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक ते उ. मा. वि. (J. C./ कनिष्ठ अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकांची बदली भिन्न पदांवरील आहे. तसेच त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये देखील तफावत आहे. तथापि, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१ (५) अन्वये माध्यमिक शाळेतून अध्यापक महाविद्यालयात अथवा अध्यापक महाविद्यालयातून माध्यमिक शाळेत शिक्षक कर्मचा-यांची बदली अनुज्ञेय आहे. शिवाय वेतनश्रेणीचा विचार करता उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालय व अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन समकक्ष आहे. पर्यायाने उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कनिष्ठ अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक ही समकक्ष पदे ठरतात. याच न्यायाने माध्यमिक शाळेतील शिक्षकांची उच्च माध्यमिक शाळेतील बदली देखील अनुज्ञेय ठरते.
शासन परिपत्रक / ज्ञापन डाउनलोड करा - Click Here
उपरोक्त बाबी विचारात घेता, मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांनी रिट याचिका क्र. ७०३०/२०१९ प्रकरणी दिनांक ५.११.२०१९ रोजी दिलेले आदेश तसेच महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१ (५) मध्ये नमूद इतर सर्वसाधारण अटी शर्तीच्या अनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती यांनी श्रीमती रसिका पातुरकर व श्री. उदय कोल्हेकर यांच्या बदलीस मान्यता तसेच उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून सातव्या वेतन आयोगानुसार देय असणारी वेतनश्रेणी देण्याची कार्यवाही करावी.
0 Comments