Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती | निबंध | भाषण

विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी या दांपत्याच्या पोटी कोलकाता शहरात झाला. शालेय जीवनात स्वामीजी अत्यंत बुध्दिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिध्द होते. 

तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. 


भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. ११ सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषदेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्‍विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली. या परिषदेत विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे, असे प्रतिपादन त्यांनी करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी, असे केले. पुढे वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये व्याख्याने दिली.

    स्वामी विवेकानंद

      दिव्यत्वाची जेथ प्रचीती
       तेथे कर माझे जुळती ..!!

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त फलकलेखन नमूने पहा. PDF डाउनलोड करा

पूर्ण नाव:- नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त

जन्म :~  12 जानेवारी 1863, 
       कोलकाता, पश्चिम बंगाल,भारत.
मृत्यू :~ 4 जुलै 1902, 
          बेलूर,कोलकाता,भारत.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला तो दिवस योग योगाने तो दिवस मकर संक्रांतीचा होता. बाळाचा नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई ह्या धार्मिक विचाराच्या होत्या. नरेंद्राच्या विचारसरणीला आकरा देण्यात त्यांच्या पालकांचा वाट आहे.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण 

1871 ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इंस्टिट्यूशनमध्ये प्रवेश .

1879 प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण , काही दिवस नंतर  जनरल असेम्बलीज इंस्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी  तर्कशास्त्र, पाश्चात्य तर्कशास्त्र आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला.
1884 बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

विवेकानंद नामकरण
    राजा अजितसिंग खात्री यांनी 10 मे 1893 या दिवशी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले.
रामकृष्ण मिशन        
   रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.

शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद 
     11 सप्टेंबर 1893  साली अमेरिकेतील शिकागो शहरात सर्वधर्मपरिषद भरली होती. ह्या परिषदेत त्यांनी सनातन धर्माचे प्रति निधीत्व करताना, वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले.

समाधी 
      4 जुलै 1902 कोलकात्या जवळील बेलूर मठात समाधी घेतली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही  अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक उभे आहे.

Post a Comment

1 Comments

close