राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै, 2024 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.
सातवा वेतन आयोग थकबाकी 5वा हप्ता अदा करणेबाबत
(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२४ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.
(ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२४ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.
7व्या वेतन आयोगाचा 1, 2 व 3रा हप्ता व वैद्यकीय बीले ऑनलाईन डिसेंबर 2023 च्या वेतनासोबत अदा करणेबाबतचे परिपत्रक 20 डिसेंबर
1. दि.१९/१२/२०२३ रोजी बिम्स प्रणलीवर उपलब्ध असलेलया अनुदानातून माहे डिसेबर च्या वेतनासोबत ७ वा वेतन आयोग १,२,३ हप्ता अदा होवून वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे
२. वैद्यकीय देयक ऑनलाईन पध्दतीने अदा करणसाठी ऑनलाईन सुबिधा देण्यात आली आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
३. वैद्यकीय देयके अदा करतांना ती आवक नोंद रजिस्टर मधिल आवक जेष्ठतेने (प्रथम आवक- प्रथम प्राधान्य) ऑन लाईन पध्दतीने अदा करण्यात यावी.
४. क्षेत्रिय स्तरावर तांत्रिक कारणास्तव / शाळांनी देयेके सादर न केल्याने अदासन २०२२-२३ मध्ये अदा करावयाचा राहिलेला सातवा वेतन आयोगाचा १ ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे.
५. ७ वा वेतन आयोग हप्ता अदा करतांना तो वेतन देयका सोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर २०२३ च्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूने संयुक्तीक ठरणार आहे.
मुबंई विभागाचे परिपत्रक - Click Here
सातव्या वेतन आयोगाचा 1, 2, 3 व 4था हप्ता अदा करणेबाबत परिपत्रक
चौथा हप्ता अदा करणेबाबत
शासन अधिसूचना वित्त विभाग, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ अन्वये विहित केली आहे. तसेच (DCPS) राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३० मे, २०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सातवा वेतन आयोग थकबाकी (पहिला/दुसरा हप्ता) देणेबाबत शासन निर्णय.- Click Here
तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक २४ जानेवारी २०१९ आणि दिनांक १ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.
राज्यात कोविड १९ (कोरोना) या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक ३० जून, २०२१ अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै, २०२1 रोजी देय असलेल्या ७ च्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे. तसेच याच शासन निर्णयान्वये दिनांक १ जुलै, २०२१ रोजी देय असलेल्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान स्थगित ठेवण्यात येऊन, थकबाकीचा चौथा हप्ता अदा करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला होता.
सातवा वेतन आयोग चौथा हप्ता अदा करणेबाबत शासन निर्णय 24 मे 2023
सातवा वेतन आयोग चौथा हप्ता अदा करणेबाबत शासन निर्णय 24 मे 2023 - Click Here
सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता अदा करणेबाबत शासन निर्णय
शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी:
(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.
(ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.
(क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. वरील (ब) आणि (क) मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत
(1) भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
(i) जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) दिनांक १ जून, २०२१ ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
२. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेवर दिनांक १ जुलै, २०२१ पासून व्याज अनुज्ञेय राहील.
३. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली तिसऱ्या हप्त्याची रक्कम दिनांक १ जुलै, २०२१ पासून २ वर्ष म्हणजे दिनांक ३० जून २०२३ पर्यंत काढता येणार नाही.
४. थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वरील बाचा क्रमांक १ ते ५ येथील शासन = आदेशांतील अन्य तरतूदींचे अनुपालन करण्यात यावे ५. सदर शासन निर्णय वित्त विभाग/सेवा-४ कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २४७/२०२२/सेवा-४, दिनांक २३/२/२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
New Update 16 मार्च 2023
0 Comments