यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-27 साठी बी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
YCMOU BEd 2025-27 जाहिरात Prospectus डाउनलोड करा. - Click Here
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन २०२५-२७ या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रमाचे प्रवेश अर्ज स्वयं संपादन करण्याबाबतचा कालावधी शैक्षणिक वर्ष २०२५-२७ प्रवेश प्रक्रियेसाठी खालीलप्रमाणे आहे.
अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत :
दि. 03/08/2025 ते दि. 04/08/2025
Telegram Channel जॉईन करा.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-27 साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे. YCMOU BEd साठी ऑनलाईन अर्ज जुलै पासून करता येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत ऑगस्ट पर्यंत आहे. त्यानंतर .. सप्टेंबर ते .. सप्टेंबर या कालावधीत अर्जाचे स्वयं संपादन करावयाचे आहे. YCMOU BEd ला अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा. तसेच DEd DTEd कोर्स पूर्ण केलेला असावा.
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/GhqtfzqFL8NJjI8j52j57z
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
YCMOU BEd Registration 2025-2027 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल?
1) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
2) ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
3) ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्यास आपण ycmou च्या help desk शी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या.
4) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास वरील लिंक वरुन ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
YCMOU B.Ed. साठीचा फॉर्म भरण्यासाठी पात्रता निकष.
1) उमेदवार पदवी प्राप्त असावा.
2) शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवाराचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा.
3) D. Ed. /D. T. Ed./ Craft Diploma यापैकी एक कोर्स झालेला असावा.
4) पदवी मध्ये 50% गुण आवश्यक. मागासवर्गीय 45% आवश्यक
5) खाजगी शाळेतील / माध्यमिक शिक्षकांना या B.Ed. साठी अर्ज करता येणार नाही.
YCMOU BEd prospect माहिती पत्रक 2025-27 - Click Here
YCMOU BEd prospect माहिती पत्रक 2025-27 - Click Here
YCMOU ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती
- प्रवेशासंदर्भातील निवडीशी संबंधित माहिती / सूचना विद्यापीठ वेबसाईटवर वेळोवेळी जाहीर करण्यात येईल. संबंधितांनी त्यासाठी नियमितपणे वेबसाईटला भेट द्यावी.
- प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, परिनियम तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि 2025-27 तुकडीच्या माहितीपुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपणास बंधनकारक असेल.
- ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेशअर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
- ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर आपणास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. याबाबत आपल्या कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार विद्यापीठ करणार नाही.
- प्रवेशासंदर्भातील सर्व विवाद नाशिक न्यायिक कार्यकक्षेच्या अंतर्गत असतील.
- सर्व अटी आणि शर्ती आपणास मान्य असल्यास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील विचारलेली माहिती भरणे पुढे सुरु ठेवण्यासाठी "ACCEPT" हे बटन दाबा. आणि फॉर्म भरायला सुरुवात करा.
main post
2 Comments
YCM B.Ed. link open hot nahi
ReplyDeleteआता सुरुवात झाली आहे.
Delete